पृथ्वी संकटात ! 130 देशांच्या 11 हजार वैज्ञानिकांचा ‘दावा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपली पृथ्वी एका भयंकर नैसर्गिक संकटात असून आर्क्टिक महासागरात असणारा हिमनग वेगाने वितळत असून 130 देशांतील जवळपास 11 हजार वैज्ञानिकांनी यासंबंधी सूचित केले आहे.

पूर्णपणे वितळणार ‘द लास्ट आइस एरिया’
130 देशांतील वैज्ञानिक ज्या भागाविषयी बोलत आहेत त्याचे नाव ‘द लास्ट आइस एरिया’ आहे. हा जगातील सर्वात जुना आणि मोठा हिमनग असून तो सध्या वेगाने विरघळत आहे.

41.43 लाख वर्ग KM परिसरातील बर्फ आता केवळ 9.99 लाख वर्ग किमी
‘द लास्ट आइस एरिया’ हा परिसर आधी 41.43 लाख वर्ग KM होता. आता तो केवळ 9.99 लाख वर्ग किमी शिल्लक राहिला असून याच वेगाने विरघळत राहिल्यास 2030 पर्यंत तो नष्ट होईल.

1970 पासून आतापर्यंत ५ फूट विरघळला आहे बर्फ
यूनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोचे वैज्ञानिक केंट मूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1970 पासून आतापर्यंत 5 फूट हा बर्फ विरघळला असून प्रत्येक दहा वर्षात 1.30 फूट बर्फ विरघळत आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढून धोका वाढू शकतो.

ग्रीनलँड – कॅनडाच्या आसपासचे हवामान बदलणार
हा हिमनग वेगाने विरघळू लागल्यामुळे लवकरच ग्रीनलँड- कॅनडाच्या आसपासचे हवामान बदलणार आहे. तेथील वातावरण गरम होणार असून याचा संपूर्ण जगावर परिमाण पडणार आहे.

पोलर बियर, व्हेल, पेंग्विन यांसारखे जीव होणार नष्ट
‘द लास्ट आइस एरिया’मध्ये विविध प्रकारचे जीवजंतू राहत असून बर्फ या वेगाने विरघळत राहिल्यास पोलर बियर, व्हेल, पेंग्विन यांसारखे जीव नष्ट होणार आहेत. जगातून त्यांचे नामोनिशाण मिटणार आहे.

Visit : Policenama.com