Mask : कपड्याचा मास्क की N 95 जास्त सुरक्षित ? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – गेल्या वर्षीपासून कोरोना संसर्गाचा फैलाव अधिक होत आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते कोरोना विषाणू हा हवेतून पसरत आहे असं सांगण्यात आलं. या कारणामुळे लोक चांगला मास्क वापरण्यास सुरुवात केली. मात्र त्यामध्ये कोणता मास्क वापरणं योग्य आहे. कापडी मास्क का एन-९५ मास्क. यामध्ये लोक गोंधळात पडू लागली. परंतु, आता गोंधळात न पडता या प्रश्नाचे उत्तर आता लोकांना मिळणार आहे.

या कारणावरून मॅरीलॅंड स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. फहीम युनूस यांनी त्याच्या अभ्यासानुसार एक माहिती दिली आहे. यंदाही आलेल्या कोरोनाच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी, आणि हवेतून पसरणाऱ्या विषाणूपासून बचावासाठी एन-९५ अथवा केएन-९५ मास्क वापरणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच ते म्हणाले. एका मास्क एका दिवशी वापरा. त्यानंतर तो मास्क पेपर बॅगमध्ये ठेवा आणि दुसरा वापरा. प्रत्येत २४ तासात अशीच मास्कची अदला-बदली करा. जर मास्कचं काही नुकसान झालं नाही तर ते अनेक आठवडे वापरले जाऊ शकतात. असे डीएनए च्या वृत्तानुसार समजते.

दरम्यान, डॉ. फहीम युनूस यांनी विना मास्क समुद्र किनारी आणि पार्कमध्ये जाऊ शकतो का ? या प्रश्नावरून त्यांनी उत्तर दिल आहे. जर २ व्यक्तींमध्ये ६ फुटांचं अंतर असेल तर अशा ठिकाणांवर विना मास्क फिरणं सुरक्षित आहे. ते म्हणाले की, एन- ९५ हा मास्क हवेतील बारीक कणांपासून आपली रक्षा करतात. हे हवेतील ९५ टक्के कण रोखण्यास सक्षम आहेत. त्यामुळे यांचं नाव N- ९५ असे पडलं आहे. जेव्हा विषय हवेतून पसरणाऱ्या विषाणूचा येतो तेव्हा N-९५ मास्क निश्चितपणे कपड्याच्या मास्कपेक्षा अधिक चांगला ठरतो. एन- ९५ आणि सर्जिकल मास्क व्यक्तिगत सुरक्षा उपकरणाचं उदाहरण आहेत. असे डॉ. फहीम युनूस यांनी याबाबत माहिती दिली आहे.