CSIR । तंबाखू खाणारे कोरोना विषाणूपासून सुरक्षित? संशोधनाच्या अहवालातून मोठा खुलासा

मुंबई  न्यूज (Mumbai News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं (CSIR) एक महत्वाचा खुलासा केला असल्याचं समोर आलं आहे. धूम्रपान अथवा तंबाखू (Smoking or tobacco) खाणाऱ्या लोकांना कोरोनापासून धोका नसल्याचा खुलासा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं (CSIR) केलाय. CSIR ने केलेल्या अभ्यासामधून एका रिपोर्टनुसार माहितीचा खुलासा केला आहे. यामध्ये तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थातील निकोटीन नावाचा पदार्थ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी ठरत आहे. मात्र, या रेपोर्टवरून काही तंबाखूजन्य (Tobacco) पदार्थांची विक्री करणारे व्यापारी आणि विक्रेत्यांनी हाय कोर्टात (High Court) धाव घेतलीय. म्हणून तंबाखुजन्य (Tobacco) पदार्थ सेवन केल्याने कोरोनाला रोखू शकतो का ? यावरून एक गोंधळ निर्माण झालं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) दाव्यानुसार तंबाखूमधील निकोटीन हा घटक कोरोनाला रोखण्यास करण्यास परिणामकारक ठरतो, या CSIR च्या दाव्यावरून अहवालाचा दाखला देत तंबाखूजन्य पदार्थांचे व्यापारी आणि विक्रेत्यांनी मंगळवारी (29 जून) मुंबई हाय कोर्टात (High Court) धाव घेतली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) रिपोर्टनुसार तंबाखू कोरोना विषाणूला रोखण्यास मदत करत असेल तर भारतात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणली जाऊ नये, अशी मागणी तंबाखूजन्य पदार्थांचे व्यापारी आणि विक्रेत्यांनी मुंबई हाय कोर्टात (High Court) केलीय.

या दरम्यान, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) रेपोर्टच्या दाव्यामध्ये तथ्य असल्यास केंद्र सरकारनं सिगारेटच्या पाकिटांवरून आरोग्यासंदर्भात वैधानिक इशारा हटवायला हवा, असा टोला मुबई हाय कोर्टानं (High Court) लागावला आहे. मात्र, तूर्त वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) अजून देखील कुठलंही स्पष्टीकरण दिलं नसल्यानं तंबाखू खाणारे कोरोनापासून खरंच सुरक्षित आहेत का? असा एक संभ्रम निर्माण झाला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : are smoker safe from corona virus big revelation from csir report high court appeal

हे देखील वाचा

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट !
आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API,
पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर