पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! IB मध्ये मोठी भरती, 1,42,400 रूपये पगार अन् भत्ते, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : देशाच्या इंटेलिजेंस ब्यूरो (Intelligence Bureau) मध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ, कॉलेजमधून कोणत्याही विषयात पदवी घेतली असेल तर तुमच्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी ठरेल. गृह मंत्रालयाने (Home Ministry, MHA) यासाठी परिपत्रक जारी केलं आहे.

असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, ग्रेड-२ (ACIO) च्या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. आयबीद्वारे यासाठी एसीआयओ परीक्षा (IB ACIO Exam) घेतली जाईल. या भरतीची माहिती खाली देण्यात येत आहे. याचबरोबर परिपत्रक आणि ऑनलाईन अर्जासाठी डायरेक्ट लिंक खाली देण्यात येत आहेत.

पदाचे नाव- असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, ग्रेड-२ (ACIO)
एकूण जागा – २०००
आरक्षण-
जनरल – ९८९
आर्थिक दुर्बल गट – ११३
ओबीसी – ४१७
एससी – ३६०
एसटी – १२१

पे स्केल – भारत सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे. ४४,९०० रुपये ते १,४२,४०० रुपये प्रति महिना पेस्केल असणार आहे. याशिवाय केंद्रीय भत्ते, विशेष सुरक्षा भत्ते आणि अन्य भत्तेदेखील दिले जाणार आहेत.

शिक्षणाची अट
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. कॉम्पुटरची माहिती असावी.
वय – १८ ते २७ वर्षे असायला हवे. आरक्षित वर्गासाठी वयात ५ वर्षांची सूट दिली जाईल.

अर्ज कसा कराल?
या भरतीच्या परिक्षेत बसण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी गृह मंत्रालयाच्या वेबसाईटवर mha.gov.in किंवा ncs.gov.in वर ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ जानेवारी २०२१ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १९ डिसेंबरपासून सुरु झाली आहे.
IDBI Bank Recruitment 2020: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयडीबीआयने (IDBI Bank) स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (Specialist Cadre Officer) पदांसाठी भरती काढली आहे.

पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, परिपत्रक आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.

पदे :
डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड-डी) – ११ पदे
असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड-सी) -५२ पदे
मॅनेजर (ग्रेड-बी) – ६२ पदे
असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ए) – ०९ पदे
एकूण पदांची संख्या – १३४

SBI SO Recruitment २०२०, Sarkari Naukri Job २०२०: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ११ जानेवारीपर्यंत उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. बँकेने सर्व विभागातील वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर केली आहे. यानुसार स्पेशालिस्ट ऑफिसरच्या रिक्त असलेल्या ४५२ पदांवर भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठीची पहिली प्रिलिम्स परीक्षा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर करण्य़ात य़ेणार आहेत.

शैक्षणिक अट
MBA, MGDM आणि BTech पदवी असलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. मॅनेजर पदासाठी वयोमर्यादा २५ ते ४५ वर्षे आहे. डेप्युटी मॅनेजर पदासाठी २१ ते ३५ वर्षे आहे. तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी २८ ते ३० वर्षे आहे. इंजिनिअर पदांसाठी ४० वर्षे आहे. मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्टॅटिक्स किंवा गणित किंवा अर्थशास्त्रामध्य़े पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असायला हवी. यामध्ये ६० टक्क्यापेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी २३ हजार ते ५१ हजार रुपये एवढा पगार दिला जाणार आहे.