तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते ? : हायकोर्ट

मुंबई : वृत्तसंस्था – ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला चार वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आरोपींचा शोध न लागल्याबद्दल हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई हायकोर्टाने ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी राज्य सरकारला प्रश्न विचारत तपासाच्या गतीवर सवाल उपस्थित केला आहे.

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांची २० फेब्रुवारी २०१५ रोजी हत्या झाली होती. मात्र, अद्यापही आरोपींचा शोध लागला नाही. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाच्या गतीवर सवाल उपस्थित करत, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते आहात. असा सवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारत राज्य सरकारला फटकारले आहे.

इतकेच नव्हे तर, मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणासाठी वेळ नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याचेही म्हटले आहे.