Video : झूमवर Live सुरू होती संसदेची बैठक, ऑन कॅमेरा गर्लफ्रेंडसोबत अश्लील चाळे करताना दिसले खासदार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    कोरोनामुळं जवळपास जगभरातील सर्व ऑफिसेसचं काम ऑनलाईनच सुरू आहे. अनेक मीटींग सध्या झूमच्या माध्यमातून घेतल्या जाताना दिसत आहेत. अशातच संसदेच्या एका ऑनलाईन मीटींगमध्ये भयंकर प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अर्जेंटीनामधील हा प्रकार आहे.

काँग्रेसच्या व्हर्चुयअल सत्रादरम्यान अर्जेंटीनामधील एक खासदार गर्लफ्रेंडसोबत अश्लील चाळे करताना दिसला आहे. ऑन कॅमेरा हा प्रकार घडल्यानं खासदारावर टीका केली जात आहे. एवढंच नाही तर या खासदाराला निलंबित करण्यात आलं आहे.

जुआन इमिलियो अमेरी हे अर्जेंटीनाच्या सलताच्या उत्तर प्रांताचे प्रतिनिधित्व करतात. संसदेचं ऑनलाईन सत्र सुरू असताना जुआन आपल्या गर्लफ्रेंडसोबत अश्लील चाळे करताना दिसले. विशेष म्हणजे लाईव्ह सत्रादरम्यान सुरू असणारा हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याचे फूटेज सोशलवर वाऱ्यासारखे व्हायरल झाले. यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. नंतर या खासदाराला निलंबित करण्यात आलं.

व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, अमेरी यांच्या मांडीवर त्यांची गर्लफ्रेंड बसली आहे. त्यानंतर वेब कॅमेऱ्यासमोर दोघांचे अश्लील चाळे सुरू झाले. निलंबनानंतर अमेरी यांनी सांगितलं की, ही महिला त्यांची गर्लफ्रेंड आहे. तसंच मी मीटींगमध्ये आहे हे मला माहितीच नव्हतं असंही ते म्हणाले आहेत.

झूम मीटींगमध्ये याआधीही असे प्रकार समोर आले आहेत. एप्रिलमध्ये कॅलिफोर्नियाच्या एका अधिकाऱ्यानं झूमच्या बैठकीत आपली मांजर फेकताना अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. त्याआधी झूमवर पालिकेच्या मीटींगदरम्यान एक कपल सेक्स करताना दिसलं होतं.