#BirthdaySpecial : एवढा वेळ गाणं गाण्यासाठी अरिजीत सिंह घेतो ‘दीड कोटी’ रुपये

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अरिजीत सिंहच्या गाण्यांचे आणि आवाजाचे अनेकजण दीवाने आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी एक नाव म्हणजे अरिजीत सिंह आहे. मधुर सूर आणि सुंदर गायिकीसाठी अरिजीत ओळखला जातो. आज अरिजीत सिंहचा वाढदिवस आहे. आज अरिजीत सिंह 32 वर्षांचा झाला आहे. पश्चिम बंगालच्या मु्र्शिदाबाद नावाच्या छोट्या शहरातून येऊन अरिजीतने मुंबईमध्ये सर्वात यशस्वी महाग गायक अशी ओळख बनवली आहे.

View this post on Instagram

Thank You #ahmedabad . You were beautiful..

A post shared by Arijit Singh (@arijitsingh) on

बॉलिवूडमधील अरिजीतचं पहिलं गाणं 2011 मध्ये आलं होतं. मर्डर 2 या सिनेमातील ‘फिर मोहब्बत करने चला है तू’ हे ते गाणं आहे. हे गाणं प्रदर्शित झालं आणि या गाण्याने अरिजीतला रातोरात स्टार बनवलं. बॉलिवूड रिपोर्टनुसार, अरिजीत 45 मिनिट गाण्यासाठी 1.5 कोटी रुपये चार्ज घेतो. शिवाय बॉलिवूडमधील एका गाण्यासाठी त्याने 16 लाखांपर्यंत पैसे घेतले आहेत.

View this post on Instagram

Thank You Dubai … You were great last night

A post shared by Arijit Singh (@arijitsingh) on

दरम्यान काही दिवसांपूर्वी सलमान खानसोबत झालेल्या वादानंतर अरिजीत सिंह खूपच चर्चेत आला होता. सलमान खान एक अवॉर्ड शो होस्ट करत होता आणि अरिजीतला आशिकी 2 साठी बेस्ट सिंगर नॉमिनेट करण्यात आलं. तेव्हा अरिजीत कॅज्युअल शर्ट आणि चप्पल घालून स्टेजवर आला होता. अरिजीतचं हे वागणं सलमानला आडवलं नाही. सलमानने विचारलं की तुम्ही झोपला होतात का तेव्हा अरिजीत म्हणाला तुम्ही लोक झोपवता. हीच चूक अरिजीत महागात पडली. त्यानंतर अरिजीतला यासाठी खुलेआण सलमानची माफी मागावी लागली शिवाय सलमानने अरिजीतला त्याच्यासाठी तरी बॅन करून टाकलं.

Loading...
You might also like