मलायकासोबत हॉलिडेवर असणारा अर्जुन कपूर म्हणतो, ‘बेइमान है आज मौसम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे व्हॅकेशनचे फोटो सध्या सोशलवर गाजताना दिसत आहेत. अर्जुन आणि मलायका दोघेही इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असतात. अर्जुनने इंस्टावर एक फोटो शेअर करत म्हटलं की, “बेइमान है आज मौसम.” सध्या हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटो व्यतिरीक्त अर्जुनने आणखी फोटो शेअर केला आहे ज्यात तो कूल पोज देत आहे. अर्जुन या लुकमध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे. त्याने सनग्लासेसही घातले आहेत. अर्जुन कपूरच्या या फोटोत आणखी एक गोष्ट आहे जी सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे ती म्हणजे एका मुलीचा हात. अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे की, फोटोत दिसणारा हा हात अर्जुनची लेडी लव्ह मलायकाचा आहे. अर्जुनचा हा फोटो खूपच पसंत केला जात आहे.

https://www.instagram.com/p/B18BNlmg0-W/

काही दिवसांपूर्वी मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर करत मलायकाने आपलं नातं इंस्टा ऑफिशियल केलं होतं. दोघंही नेहमीच सोबत स्पॉट होत असतात. या कपलची केमिस्ट्रीही शानदार आहे. अर्जुन आणि मलायका बॉलिवूडमधील चर्चित कपलपैकी एक आहेत.

https://www.instagram.com/p/B10pWyOg1o-/

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अर्जुन सध्या पानीपत या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात अर्जुन कपूर त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात कठिण रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमात अर्जुन एका योद्ध्याच्या भूमिकेत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –