चर्चित कपल ‘मलायका-अर्जुन’चा म्हाताऱ्या लुकमधील फोटो व्हायरल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मीडियावर सध्या सेलेब्रिटींचे म्हाताऱ्या रुपातील फोटो झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे. सोनम कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि यानंतर आता बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा म्हाताऱ्या लुकमधील फोटो वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. अर्जुन कपूरनेही आपला म्हाताऱ्या रुपातील फोटो सोशलवर शेअर केला आहे.

म्हातारा लुक असला तरी त्यातही अर्जुन कपूर हँडसम दिसत आहे. या फोटोत अर्जुन पांढऱ्या केसात, पांढऱ्या टीशर्टमध्ये दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसत आहेत. या फोटोतील खास बात अशी की, त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या तर आहेच. परंतु त्याची फिट बॉडी मात्र सर्वांचे ध्यान आकर्षित करताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अर्जुन कपूर म्हणतो की, “Old age hit me like ..” अर्जुनची बहिण जान्हवी कपूरने या फोटोवर कमेंट करत म्हटले आहे की, “OMG”

View this post on Instagram

Old age hit me like .. 👀

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

दुसरीकडे अर्जुन कपूरची लेडी लव मलायका अरोराही आपल्या म्हाताऱ्या रुपातील फोटोत स्टनिंग दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील ग्लो आणि फिटनेस कायम दिसत आहे. मलायका आणि अर्जुन यांचे म्हाताऱ्या रुपातील फोटो पाहता, म्हातारे झाल्यानंतरही हे कपल आपल्या लुक आणि फिटनेसने सर्वांना टक्कर देऊ शकतं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. एज ओल्ड फिल्टर वापरून हा फोटो तयार करण्यात आला आहे.
मलाइका अरोड़ा और अर्जुन कपूर

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच अर्जुन कपूर पानीपत या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात संजय दत्तही लिड रोलमध्ये असणार आहे. 6 डिसेंबर 2019 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

Loading...
You might also like