Video : अर्जुन आणि मलायकाचा पुन्हा एकदा एकत्र ‘स्पॉट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या अनेक दिवसांपासून लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत असल्याचे दिसत आहे. अशातच ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांना आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवातही केली आहे.

या व्हिडीओत दिसत आहे की, दोघेही कदाचित एकत्र आले असावे. एकत्रच त्यांना स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांना पाहताच फोटोग्राफर्सने त्यांना घेरल्याचे दिसत आहे. रात्रीच्या वेळेसचाच हा व्हिडीओ असल्याचे दिसत आहे. अवघ्या 8 मिनिटात या व्हिडीओला 6 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावरूनच लक्षात येते की, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनी अनेक वेगवेगळ्या कमेंट्स या व्हिडीओवर केल्याचे दिसत आहे. एका युजरने तर म्हटले आहे की, “दोघेही एकमेकांसोबत अगदी परफेक्ट दिसत आहेत.”

https://www.instagram.com/p/BxyoYa-H09T/

अर्जुन कपूर आणि मलायका यांचा हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांकडून शेअर केला जात आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूर सोबतच्या रिलेशनशिपमुळेही मलायका चांगलीच चर्चेत आहे. अर्जुन कपूरच्या इंडियाज मोस्ट वॉन्टेड या सिनेमाच्या प्रीमियरमध्येही ती दिसली होती. अर्जुनच्या अभिनयाचेही तिने कौतुक केले होते. यावेळी अर्जुनला सिनेमावरील मलायकाच्या प्रतिक्रियेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. अर्जुनने या प्रश्नाला टाळत तो म्हटला होता की, “यावर मी नंतर बोलेल.”

https://www.instagram.com/p/Bxt15uqAslB/