Arjun Kapoor | पुन्हा एकदा अर्जुन कपूरची पोस्ट चर्चेत; म्हणाला – ‘तुमच्या कर्माची फळं…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Arjun Kapoor | सध्या बॉलिवूडमध्ये अनेक कपल चाहत्यांचे आवडते कपल म्हणून ओळखले जातात. अशा या कपलचे रोमँटिक अंदाज फोटोज व्हिडिओज चाहत्यांना खूपच आवडत असतात. यातीलच लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. हे दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसतात. तर सध्या या दोघांच्या चर्चादेखील जोरात सुरू असताना दिसत आहेत. अलीकडेच मलायका अर्जुन कपूरच्या बाळाची आई होणार या गोष्टींच्या चर्चा सुरू असतानाच यावर अर्जुन कपूरने संताप व्यक्त करत या सगळ्या अफवा पसरवणाऱ्यांवर त्यांनी सडकून टीका केली होती. (Arjun Kapoor)

 

पुन्हा एकदा अर्जुन कपूरने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले होते की” प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळ ही मिळतच असतात. हे जग गोल आहे आपण जे पेरतो तेच आपल्याला मिळते. मला कोण काय म्हणतं याचा काहीच फरक पडत नाही. तुम्ही माझ्याशी जसे वागाल मीदेखील तुमच्याशी तसेच वागणार. तुम्हाला तुमच्या कर्माची फळं लवकर किंवा उशीर का होईना, पण भोगावी लागतातच,” अशा शब्दांत त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. (Arjun Kapoor)

 

अर्जुनच्या या पोस्टवरून मलायकाच्या आई होण्याच्या अफवा ऐकून त्याचा राग अजूनही शांत झालेला नसल्याचे समोर आले आहे.
गेल्या 3 वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत, तर लवकरच हे दोघे लग्न बंधनात अडकतील अशा चर्चादेखील सुरू होत्या.
मात्र, अद्याप तरी यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. यामुळे चाहते या दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

Web Title :- Arjun Kapoor | arjun kapoor again shares cryptic post after malaika arora pregnancy fake rumours goes viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune ACB Trap | दीड लाखांची लाच घेताना शिवाजीनगर कोर्टातील वरिष्ठ लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Nashik Crime | मनमाडमध्ये हात कापून 9 वर्षांच्या बालकाची हत्या; प्रचंड खळबळ

Recruitment In Revenue Department Maharashtra | राज्यात होणार तब्बल 4 हजार 122 तलाठयांची भरती, जाणून घ्या सविस्तर