Birthday SPL : बॉलिवूड डेब्यूआधी ‘असा’ दिसायचा अर्जुन कपूर ! शेअर केले ‘अनसीन’ फोटो

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर आज (शुक्रवार दि 26 जून 2020) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुनचा जन्म 1985 साली मुंबईत झाला होता. निर्माता बोनी कपूरच्या घरी जन्मलेल्या अर्जुन कपूरबद्दल तुम्हाला अनेक गोष्टी माहिती असतीलच. परंतु आज आपण काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

अर्जुन कपूरनं इश्कजादे सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. परंतु सर्वात आधी तर त्यानं निखिल आडवाणीचा सिनेमा कल हो ना हो साठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं होतं.

याशिवाय अर्जुननं निखिल आडवाणीच्या सलाम ए इश्क या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे.

अर्जुन कपूरला आपल्या को अ‍ॅक्ट्रेसेजला कंपेअर केलेले चांगलं नाही वाटत. अर्जुनला वाटतं त्या दोन अ‍ॅक्ट्रेसला कंपेअर करण्याचा काहीही अधिकार नाही.

सध्या मलायका अरोरासोबतच्या रिलेशनशिपमुळं चर्चेत राहणाऱ्या अर्जुन कपूरनं एके काळी सलमान खानची बहिण अर्पितालाही डेट केलं आहे. दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी ब्रेकअप केलं होतं.

बॉलिवूडमध्ये अर्जुन कपूरचा मेंटर सलामन खानच आहे. त्यानंच अर्जुनला सल्ला दिला होता की, इ़ंडस्ट्रीत यायचं असेल तर वजन कमी कर. यानंतर 140 किलो वरन असणाऱ्या अर्जुन कपूरनं स्वत:वर काम केलं.

अर्जुन कपूर त्याच्या आईच्या खपू क्लोज आहे. त्यानं आईसाठी त्याच्या हाताच्या मनगटावर टॅटूही बनवला आहे.

अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच तो पानीपत सिनेमात दिसला होता. हा एक पीरियड ड्रामा होता. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ठिकठाक कमाई केली. यानंतर आता लवकरच तो संदीप और पिंकी फरार या सिनेमात दिसणार आहे. 20 मार्च 2020 रोजी हा सिनेम रिलीज होणार होता.