अभिनेत्री श्रीदेवीचा ‘सावत्र’ मुलगा बहिणींसाठी बनला ‘ढाल’

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर इंडस्ट्रीला जोडलेला असा व्यक्ती आहे ज्याची पर्सनल लाइफ नेहमी चर्चेमध्ये असते. सावत्र आई श्रीदेवी यांच्यासोबत त्याचे नाते, बोनी कपूर यांचे कनेक्शन आणि आता मलायका अरोरा यांच्यासोबतचे अफेअर अशा काही गोष्टींमुळे तो नेहमी चर्चेमध्ये असतो. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो चाहत्यांचे मन जिंकले आहे. अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुनने केवळ आपले वडील बोनी कपूर यांना सांभाळले नाही तर बहिण खुशी आणि जान्हवी यांना पण आधार दिला आहे.

असे समजले आहे की, अर्जुन आणि श्रीदेवी यांचे नाते काही ठिक नव्हते. कारण श्रीदेवी बोनी कपूर यांची दुसरी पत्नी होती. यामुळे श्रीदेवीच्या मुलींसोबत अर्जुनचे बॉंडींग आपली बहिण अंशुलासारखे नव्हते पण श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन आपल्या तिन्ही बहिणींसाठी ढाल बनला आहे. मग ते इमोशनल आधार देण्यासाठी असो किंवा मग सोशल मिडियावर कमेंट आणि ट्रोलर्सला उत्तर देण्यासाठी असो. त्याने प्रत्येकवेळी बहिणींना आधार दिला आहे. यामुळे त्याने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

अर्जुनचे फॅमिली लाइफमधून वेगळ्या लव लाइफमध्ये खूप गमतीशीर किस्से आहेत. ज्यामुळे तो चर्चेमध्ये असतो. ३३ वर्षाचा अर्जुनचे नाव त्याच्यावरुन १२ वर्षाने मोठी असलेली अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत जोडले जात आहे. त्यांच्या लग्नाविषयी चर्चा ही सोशल मिडियावर पसरली होती. लग्नाविषयी अर्जुन स्पष्ट म्हणाला की, लग्नाला अजून टाइम आहे.

अद्यापही अर्जुन आणि मलायकाने त्यांच्या नात्याबद्दल कबूल केले नाही पण सोशल मिडियावर यांचे फोटो आणि फोटोंना आलेली कमेंट यावरुन खूप काही कळते. मलायकाचा घटस्फोट आणि अर्जुनच्या वयामधील अंतर याबद्दलही खूप प्रश्न उपस्थित केले गेले होते पण या गोष्टींवर अर्जुनने कधी विचार केला नाही.

आरोग्यविषयक वृत्त – 

कमी झोप घेऊन जास्त काम करणे शरीरासाठी घातक

डोळे लाल होण्याची ‘ही’ आहेत कारणे, दुर्लक्ष करू नका

त्वचेचा ‘ग्लो’ वाढवायचाय ? ‘या’ उपायांनी दिसेल ७ दिवसात परिणाम

लिव्हरसाठी ‘हे’ पदार्थ धोकादायक