अर्जुन कपूर मलायकाला सोडून ‘तिच्या’सोबत गेला पहिल्या ‘ब्लाईंड डेटवर’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या आपला हॅप्पी स्पेस एन्जॉय करत आहेत. दोघं नेहमीच एकत्र स्पॉट होत असतात. अशातच आता बामती समोर आली आहे की, अर्जुन कपूर ब्लाईंड डेटवर गेला होता. पंरतु तो मलायकासोबत नव्हता. यात एक ट्विस्ट आहे.

करण जोहर नेटफ्लिक्सवर एक शो घेऊन येत आहे ज्याचं नाव आहे What The Love. या शोमध्ये अर्जुन कपूर कंटेस्टेंट आशी सोबत ब्लाईंड डेटवर गेला आहे. इंस्टावर अर्जुननं या शोबद्दल माहिती देणारा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना अर्जुन म्हणतो, “What The Love- Behind the Scene. माझी पहिली ब्लाईंड डेट. ही खूप शानदार होती. What The Love नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाली आहे.”

व्हिडीओत दिसत आहे की आशी अर्जुन कपूर सोबत खूपच कम्फर्टेबल दिसत आहे. दोघांनी सोबत बरीच मस्ती केली आहे. इतरही अनेक सेलिब्रिटींच्या ब्लाईंड डेटची झलक यात पहायला मिळत आहे.

अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं नुकताच तो पानीपत सिनेमात दिसला होता. हा एक पीरियड ड्रामा होता. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ठिकठाक कमाई केली.

https://www.instagram.com/p/B2ttgCmnzse/