..म्हणून अर्जुन कपूर मलायकाला वारंवार नेत आहे रुग्णालयात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मलायकाने करण जौहर च्या चॅट शोमध्ये तिला अर्जुन कपूर आडवत असल्याचे सांगतिले होते. अर्जुन आणि तिच्या नात्याबाबत तिने सांगतिले होते. नुकतेच त्यांना मुंबईतील एका रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट करण्यात आले आहे. ज्याला घेऊन आता अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. आता या सर्वावरून पडदा उठला आहे.

डिनर पासून पार्ट्यांपर्यंत अनेक ठिकाणी नेहमी अर्जुन कपूर आणि मलायका यांना सोबत स्पॉट केले जात आहे. गुरुवारी यांना एका वेगळ्याच ठिकाणी स्पॉट करण्यात आलं आहे. या दोघांनाही लिलावती रुग्णालयात जाताना स्पॉट करण्यात आलं होतं.

समोर आलेल्या वृत्तांनुसार, हे कपल प्रीमॅरिटल चेकअपसाठी रुग्णालयात गेले होते. तज्ज्ञांच्या मते कुंडली पेक्षा ते हेल्थ चेकअपवर जोर देणं गरजेचं आहे. प्रीमॅरिटल चेकअपमुळ कपल्सना एकमेकांची देखभाल करण्यासाठी मदत होते. या चेकअपमुळे आनुवांशिक आणि संक्रामक आजारांची माहिती मिळते. त्यामुळे आता हे कपल प्रीमॅरिटल चेकअपसाठी वारंवार रुग्णालयात जाताना दिसत आहे.

आता या चेकअपनंतर असे लक्षात येते की दोघांच्या लग्नाची चाललेली चर्चा खरी आहे. ईस्टर वीकेंडला ते लग्न करू शकतात असेही म्हटले जात आहे.

नुकतीच मलायकाच्या एका पोस्टचीही मोठी चर्चा होताना दिसत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं होतं की, “जळवची व्यक्ती, एक असा माणूस, ज्याला भेटल्यानंतर एक कनेक्शन जाणवतं. इतकं डीप कनेक्शन की याआधी तुम्हाला असं कधी जाणवलंच नाही. वेळ सरत गेली तसं ही ओढ वाढत गेली, डीप होत गेली.”

पुढे तिने असेही लिहिले आहे की, “तु्म्हाला याची जाणीव होऊ लागते की, त्यामुळे तुम्हाला जाणीव होते की, तुम्हाला ती व्यक्ती खूप आवडायला लागली आहे. तुमच्या जवळची व्यक्ती नेहमीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगते. ती तुम्हाला शांती, सुख देते आणि तुमच्या चौफेर आनंद पसरवते.” मलायकाच्या या पोस्टवरून तिच्या आयुष्यात कोणीतरी असल्याचे स्पष्ट होते.

You might also like