‘अर्जुन-परिणिती’च्या ‘संदीप और पिंकी फरार’चं फर्स्ट पोस्टर OUT, ‘या’ दिवशी रिलीज होणार सिनेमा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि परिणीति चोपड़ा स्टारर ‘संदीप और पिंकी फरार’ हा सिनेमा याच महिन्यात 20 तारेखला म्हणजेच 20 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे. दिबाकर बॅनर्जी दिग्जर्शित या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सिनेमाचं पोस्टर खूपच इटरेस्टींग आहे. कारण चाहत्यांसाठी यात एक सरप्राईज लपलेलं आहे.

संदीप और पिंकी फरारचं पोस्टर आउट
टायटल पाहून सर्वांना वाटलं असेल की, अर्जुन कपूर संदीपच्या भूमिकेत असेल आणि पिंकीच्या भूमिकेत परिणिती असेल. परंतु इथेच एक मोठं ट्विस्ट आहे. पोस्टरमध्ये दिसत आहे की, पिंकीची भूमिका अर्जुन कपूर साकारत आहे तर संदीपची भूमिका परिणिती साकारत आहे. ही अदलाबदल का करण्यात आली आहे हे मात्र सिनेमा आल्यानंतरच समजेल.

दोन वेळा बदलली रिलीज डेट
आधी हा सिनेमा 2018 साली रिलीज होणार होता. यानंतर सिनेमाची रिलीज डेट बदलून 2019 झाली होती. परंतु काही कारणास्तव सिनेमा रिलीज करण्यास उशीर झाला. आता हा सिनेमा 20 मार्च 2020 रोजी रिलीज होणार आहे.