मलायकाशी ‘फ्लर्ट’ करणाऱ्याला अर्जुनने ‘खडसावले’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूडमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपुर यांना सुपर हॉट कपल मानले जाते. सोशल मिडीयावर कधी त्यांच्या फोटो तर कधी लग्नांच्या चर्चांना उधाण आलेले असते. अलीकडे सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यात मलायका अरोराशी फ्लर्ट करणाऱ्याला शेजारी बसलेल्या अर्जुन कपूरने चांगलेच खडसावले आहे.
नुकताच मेलबर्न झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिवल मध्ये हे दोघेही उपस्थित होते. यात अर्जुन कपूर मलायकाच्या शेजारी बसला होता. फेस्टिवलचे निवेदन अभिनेता करण टैकर करत होता. यावेळी दोघांना सोबत बसलेले पाहून त्यांची थट्टा करण्यासाठी तो तिथे गेला. थट्टा करता करता त्यांने मलायकाशी फ्लर्ट करायला सुरवात केली. यावेळी पझेसिव झालेल्या अर्जुनने त्याला चांगलेच खडसावले.

फेस्टिवलमध्ये मलायकाने रेड गाऊन परिधान केला होता तर अर्जुनने काळ्या रंगाचा सुट घातला होता. कार्यक्रमाचे निवेदन करता करता करण प्रेक्षकांमध्ये बसलेलल्या मलायका आणि अर्जुन जवळ गेला. त्यानंतर अर्जुनला चिडविण्यासाठी त्याने अर्जुनला तो म्हणाला,” तू खुप नशीबवान आहेस की तुला मलायकाच्या शेजारी बसण्याची संधी मिळाली. ” यावर अर्जुन लगेच उठला आणि त्याच्या हातातील माइक घेत मागे बसलेल्या प्रेक्षकांकडे खुणावत त्याला ” तिथे जाऊन फ्लर्ट कर” असा सल्ला दिला. मलायकाच्या बाबतीतील त्याचा पझेसिवपणा पाहुन उपस्थित प्रेक्षकही हसायला लागले. हे पाहताच मलायकादेखील लाजली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर खुप व्हायरल झाला आहे. फेस्टिवलसाठी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.

आरोग्यविषयक वृत्त