अर्जुन कपूरचा खुलासा : ‘पानीपत’ मध्ये संजय दत्त सोबत काम करताना येतात ‘या’ समस्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आशुतोष गोवारीकर निर्मित चित्रपट ‘पानीपत’या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत असणार आहे. सध्या ‘पानीपत’ चित्रपटाची शुटींग सुरु आहे. एका सुत्राच्या माहितीनूसार, हा चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे बजेट मोठे आहे. दरम्यान अर्जुन कपूरने एक खुलासा केला. एका मुलाखतीत अभिनेता अर्जुन कपूरने संजय दत्तसोबत काम करतानाचे अनुभव शेअर केले.

हा खुलासा अर्जुन कपूरने बेलवेडेरे स्टूडिओ लॉंचच्या कार्यक्रमात केला. यावेळी अर्जुनने सांगितले की, ‘मी नुकतेच अभिनेता संजय दत्त सोबत चित्रपटात काम करत आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव माझा चांगला होता. संजय दत्त अशा कलाकारांमध्ये आहे ज्यांना पाहून मी मोठा झालो.

संजय दत्त यांचे व्यक्तीमत्व त्यांच्या आयुष्यापेक्षा मोठे आहे. जेव्हा आपण सेटवर त्यांच्यासोबत चालत असतो. तेव्हा या गोष्टीचे जाणीव होते की, त्यांचे व्यक्तीमत्व त्यांच्या आयुष्यापेक्षा मोठे का आहे? ‘

अर्जुन पुढे म्हणाला की, संजय दत्त ज्या प्रकारे बोलतात, असे वाटतच नाही की, ते चित्रपटाचे खलनायक आहे. पण जेव्हा मी त्यांच्या समोर उभा राहतो तेव्हा मला याची भीती वाटते की, एवढ्या मोठ्या कलाकारासोबत काम करणे खुप अवघड आहे. त्यांच्या चित्रपटसृष्टीमधील अनुभवापुढे आपला अनुभव काहीच नसतो.