अर्जुन कपूरचा नवा गौप्यस्फोट, मलायकाशी लग्न केलं तर…

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्याविषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. हे दोघे नेहमीच कोणत्यानाकोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा हे कपल चर्चेत आले आहे. काही दिवसांपुर्वीच मलायकाने तिच्या ड्रीम वेडिंगच्या आयडीया शेअर केल्यानंतर यांच्या लग्नाचा अंदाज लावला जात आहे. याच दरम्यान अर्जुन कपूरने मलायकासोबत लग्नाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अर्जुन कपूरने एका मुलाखतीमध्ये लग्नाचा प्लॅन शेअर केला. यासोबतच त्याने सांगितले की, त्याचे लग्न गुपचूप होणार नाही. तो म्हणाला की, ‘सध्या तरी आमचा लग्नाचा कोणताच विचार नाही. पण जेव्हा मी लग्न करेन तेव्हा सर्वांना बोलवेन. माझी पुर्ण फॅमिली बिग फॅट वेडिंगमध्ये विश्वास ठेवते. त्यामुळे माझे लग्न होईल तेव्हा सर्वांना नक्कीच कळेल.’

या आधी मलायका अरोराने नेहा धुपियाचा शो ‘नो फिल्टर नेहा’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने अर्जुन आणि तिच्या नात्याविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या. मलायका अर्जुनबद्दल म्हणाली की, ‘अर्जुन प्रत्येक गोष्टीत परफेक्ट आहे. मात्र त्याला पैसा सांभाळता येत नाही.’ याशिवाय तिने लग्नाबद्दल देखील चर्चा केली. तिच्या बोलण्यावरुन ती लग्नासाठी किती उत्साही आहे हे दिसून येते.

ड्रीम वेडिंगबद्दल बोलताना मलायका म्हणाली की, ‘माझे लग्न वेडिंग बीचवर होईल आणि हे एक व्हाइट वेडिंग असेल. लग्नात मला Elie Saab gown घालायचा आहे आणि माझी गर्ल्स गँग माझ्या ब्राइडमेट्स असतील. मला ब्राइडमेट्स ही संकल्पना खूप आवडते त्यासाठी मला व्हाइट वेडिंग करायचं आहे.’

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/