भाजपचा पराभव निश्चित ; अर्जुन खोतकरांचा दावा 

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचे वाद जनतेला काही नवीन नाहीत. दोघे एकमेकांवर टीका करण्याची संधी कधीच सोडत नाहीत. अर्जुन खोतकरांनी दानवेंवर पुन्हा निशाणा साधत भाजप सहयोगी खासदार संजय काकडेंना पाठिंबा दिला.

राज्यात शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर रावसाहेब दानवे दीड ते दोन लाख मतांनी पराभूत होतील, असं मत भाजपचे खासदार संजय काकडेंनी व्यक्त केलं होते. तो धागा पकडत अर्जुन खोतकरांनी दानवेंवर टीका केली आहे. संजय काकडे यांनी देशभरातील अभ्यासाअंतीच हे वक्तव्य केलंय. आजपर्यंत काकडे यांचे सर्व अंदाज खरे ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या अंदाजापेक्षा जास्त मतांनी रावसाहेब दानवे जालन्यातून पराभूत होतील, असा दावा शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला.

रावसाहेब दानवे आजपर्यंत फक्त शिवसेनेमुळेच निवडून आले आहेत. आतापर्यंत दानवेंसाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्याज्यांनी मदत केली त्या सर्वांनाच त्यांनी शत्रू बनवून घेतलंय. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीमाझा विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, असे झालेतर संजय काकडेंना राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ येणार नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Loading...
You might also like