Arjun Khotkar | ‘आपलं ठेवायचं झाकूण आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून’ अशी सवय गोरंट्याल यांना आहे; अब्दुल सत्तार यांच्यावरील टीकेवर अर्जुन खोतकर यांचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknah Shinde) यांच्या गटातील बंडखोर आमदार (Rebel MLA) आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत चालू असलेल्या एका बैठकीत आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यावेळी अब्दुल सत्तार हे बैठक सोडून निघून गेले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांच्या भाषेवर आणि बोलण्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Party Chief Uddhav Thackeray) यांच्या गटातील आमदार कैलास गोरंट्याल (Kailash Gorantyal) यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी उत्तर दिले आहे.

स्वत:चे ठेवायचे झाकूण आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, असे म्हणत अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
खोतकर यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील (Shivaji Park) दसरा मेळाव्याचा दाखला (Dasara Melava 2022) दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या गटाला ‘डुक्कर’ असे म्हटले होते. त्यावर खोतकर यांनी भाष्य केले.

गोरंट्याल यांनी सर्वप्रथम दुसऱ्याच्या घरात डोकाविण्यापेक्षा आपल्या घरात लक्ष घालावे.
त्यांच्या नेत्यांनी इतरांना प्राण्यांची उपमा द्यायची आणि आमदारांनी दुसऱ्यांना सांगत फिरायचे,
असे खोतकर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गोरंट्याल यांच्या सल्ल्याची गरज नाही.
त्यामुळे त्यांनी फुकटचे सल्ले देणे बंद करावे, असे देखील खोतकर म्हणाले.

Web Title :- Arjun Khotkar | Gorantyal has the habit of ‘holding your own and bending to look at others’; Arjun Khotkar’s Reply to Abdul Sattar’s Criticism

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा