‘ऐकाहो रावसाहेब जालन्याची जागा मला लढू द्या ना’ : अर्जुन खोतकर 

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्याची लोकसभेची जागा सोडून द्यावी. आणि ती जागा मला देण्यात यावी असा आग्रह राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंना केला. एका कार्यक्रमा दरम्यान दानवे आणि खोतकर एकाच व्यासपिठावर उपस्थित होते त्यावेळी त्यांनी आग्रह केला.

शिवसेनेचे राज्यमंत्री तसेच जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. शिवसेना-भाजपने युतीची घोषणाही केली आहे. त्यामुळे, दानवे आणि खोतकर यांच्यातील वादामुळे लोकसभा निवडणुकीवर काही परिणाम होऊ नये म्हणून, भाजपकडून दानवे आणि खोतकर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे रावसाहेब दानवेंना घेऊन खोतकरांच्या दर्शना बंगल्यावर दाखल झाले होते. त्यानंतर या तिघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. दरम्यान, जालना लोकसभा मतदारसंघाबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील. माझे नेमके काय म्हणणे आहे, हे मी सुभाष देशमुखांना सांगितले आहे. अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी बैठकीनंतर दिली होती.

याचदरम्यान एका पुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी दानवे आणि खोतकर एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी  बोलतांना जालना लोकसभेची जागा मला सोडावी, मला तिथे निवडणूक लढू द्यावे. असे अर्जुन खोतकर यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, जालना मतदार संघाबाबत अद्याप आमचा निर्णय झालेला नसून आम्ही बाजूला गेलेलो नाही. असेही त्यांनी म्हंटले.

ह्याही बातम्या वाचा –

दक्षिण मध्य मुंबई नाही तर नाही ‘ही’ तरी जागा द्या : रामदास आठवले

लोकसभेसाठी ३३ टक्के महिला उमेदवार

विखे यांच्या भाजप प्रवेशास विरोध ; पालकमंत्र्यांच्या कार्यालयातच कार्यकर्त्यांची बैठक

रामदास आठवलेंच्या अडचणीत वाढ ; दक्षिण-मध्य मुंबईतून शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा

मुख्यमंत्री फडणवीस यांचा घणाघात ; राज ठाकरे सुपारी घेऊन भाषणे करतात