Arjun Khotkar | ‘उद्धव ठाकरेंशी बोलून CM एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचा निर्णय’ – अर्जुन खोतकर

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Arjun Khotkar | मी शिवसैनिकांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी त्यांना पाठींबा देत आहे. काही परिस्थितीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, तसे मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray) यांना सांगितले आणि त्यामुळे त्यांचे समाधान झाले आहे, असे जालना येथील पत्रकार परिषदेत सांगत शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी शिंदे गटाला (Shinde Group) पाठिंबा दिल्याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत खोतकर यांना अश्रु अनावर झाले होते.

 

जालना साखर कारखान्याची (Jalna Sugar Factory) तापडिया यांनी केलेली खरेदी आणि त्यामध्ये खोतकर यांनी गुंतवलेले पैसे, अजित सिड्सचे कारखान्याला लागलेले नाव, त्यानंतर शेतकर्‍यांचे झालेले हाल, कोरोनाचे संकट, खोतकरांची झालेली कोंडी असे सर्व विषय सविस्तरपणे खोतकर (Arjun Khotkar) यांनी या पत्रकार परिषदेत मांडले. तसेच मतदारांचे सुद्धा आभार मानले.

खोतकर म्हणाले, आज या भागातील शेतकर्‍यांची (Farmer) मागणी आहे, की कारखाना सुरू केला पाहिजे. म्हणून या संदर्भात काही चर्चा मी घडवून आणल्या. याबरोबरच मुख्यमंत्र्यांशी माझे बोलणे झाले. माझ्या भागातील हतवण हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या संदर्भात आपण सहकार्य करावे, त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. शहरात आठ – दहा दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही, या प्रश्नाकडे देखील मी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. याशिवाय, रस्ता प्रश्न, गौतम बुद्धांच्या पुतळ्याचा प्रश्न, पीआर कार्डचा प्रश्न आदी सर्व प्रश्नांबाबत माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, असे खोतकर म्हणाले.

 

खोतकर (Arjun Khotkar) पुढे म्हणाले, आज सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझे या संदर्भात सविस्तर बोलणे झाले.
मी माझ्यावर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या संदर्भात त्यांना सांगितले.
संजय राऊत (Sanjay Raut), विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांच्याशी देखील बोललो.
जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी बोललो. माझी ही भूमिका आहे, 40 वर्षांपासूनचा मी सच्चा शिवसैनिक आहे.
आणि घरी आलं की परिवार दिसतो. त्यामुळे काही निर्णय करणे गरजेचे आहे,
असे सांगून मी पक्षप्रमुखांकडे परवानगी मागितली आणि ते मला यासंदर्भात जे काही बोलायचे ते बोलले.
त्यामुळे मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देतो आहे.
काही परिस्थितीनुसार मला हा निर्णय घ्यावा लागतोय, असेही मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले आणि त्यामुळे त्यांचे समाधान झालेले आहे.
आजपासून मी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहे, असे खोतकर यांनी म्हटले.

 

Web Title : – Arjun Khotkar | shivsena leader arjun khotkar supports cm eknath shinde group

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा