लग्नाआधीच प्रेग्नंट आहे ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची गर्लफ्रेंड, आता म्हणतो…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या चर्चेत आला आहे. त्याची गर्लफ्रेंड लग्नाआधीच प्रेग्नंट आहे. अर्जुनने त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड (Gabriella Demetriade) हिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गॅब्रिएला प्रेग्नंट असल्याचे स्पष्ट दिसत आहे. शिवाय अर्जुनने या फोटोला खास कॅप्शनही दिले आहे. अर्जुन आपल्या कॅप्शनमध्ये म्हणतो की, “तू माझ्या आयुष्यात आलीस आणि या नव्या सुरुवातीमुळे मी फार आनंदी आहे. या बाळासाठी धन्यवाद.” असे अर्जुनने आपल्या प्रेयसीचे आभार मानले आहेत.

अर्जुनला त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीपासून दोन मुली आहेत. माहिका आणि मायरा अशी त्यांची नावे असून मेहर असं त्याच्या आधीच्या पत्नीचं नाव आहे. त्यामुळे आता अर्जुन तिसऱ्यांदा बाबा होणार आहे असे दिसत आहे. अर्जुन येणाऱ्या बाळासाठी खूपच खुश असल्याचे दिसत आहे. अर्जुनने शेअर केलेल्या फोटोवरून स्पष्ट दिसत आहे की, कदाचित त्याने मॅटर्निटी फोटोशुट केलं आहे.

गॅब्रिएला ही दक्षिण आफ्रिकेची मॉडेल आहे. दरम्यान गॅब्रिएला ही काही सिनेमांमध्ये आणि म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे. तिला खरी ओळख मिस IPL बॉलिवूड हा किताब जिंकल्यानंतर झाली. 2009 मध्ये तिने मिस इंडियन प्रिमिअर लीगमध्ये भाग घेतला होता त्यानंतर एफएचएमच्या जगातील 100 मादक महिलांमध्ये तिची निवड झाली.

अर्जुन रामपालच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ZEE5 च्या वेब सीरिज द फायनल कॉल मध्ये दिसला होता. .दरम्यान अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी अद्याप लग्न केलेले नाही.