अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड लग्नाआधीच प्रेग्नंट, त्याची आधीची पत्नी मेहर म्हणते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याचा आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाचा सोबतचा फोटो होता. त्यात ती प्रेग्नंट असल्याचं दिसत होतं. आपण बाबा होणार असल्याचं त्याने या पोस्टमधून सांगितलं होतं.

अर्जुनची बाबा होण्याची ही तिसरी वेळ आहे. त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुली आहेत. आता 44 वर्षांचा अर्जुन पुन्हा बाबा होणार आहे. अर्जुनने ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्याला दिल्या. यानंतर आता त्याची पहिली पत्नी मेहर जेसियानं यावर प्रतिक्रिया दिली आहे. मेहरच्या निकटवर्तीयाने एका मुलाखतीत तिने दिलेल्या प्रतिक्रियेबाबत उल्लेख केला आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृ्त्तानुसार, मेहरला अर्जुनची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाच्या प्रेग्नंसीविषयी काहीच समस्या नाही. अर्जुन त्याच्या आयुष्यात खूप पुढे गेला आहे हे तिने स्विकारले आहे. मेहर एक चांगली आई आहे. तिला आपल्या मुलींच्या भविष्यासाठी योग्य असेल ती प्रत्येक गोष्ट करायची आहे.

अर्जुनच्या मुलीही त्याच्या निर्णयावर खुश आहेत असा अंदाज लावला जात आहे. कारण गॅब्रिएलाच्या प्रेग्नंसीची पोस्ट शेअर केल्यानंतर अर्जुन त्याच्या दोन्ही मुली मिहिका आणि मायरा सोबत डिनरसाठी जाताना स्पॉट झाला होता. त्या तिघांमध्ये छान बॉंडिंग दिसत आहे.

गॅब्रिएला ही दक्षिण आफ्रिकेची मॉडेल आहे. दरम्यान गॅब्रिएला ही काही सिनेमांमध्ये आणि म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे. तिला खरी ओळख मिस IPL बॉलिवूड हा किताब जिंकल्यानंतर झाली. 2009 मध्ये तिने मिस इंडियन प्रिमिअर लीगमध्ये भाग घेतला होता त्यानंतर एफएचएमच्या जगातील 100 मादक महिलांमध्ये तिची निवड झाली.