अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडनं शेअर केला ‘टॉपलेस’ फोटो, दोन च महिन्यांपूर्वी बनली आई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स नेहमीच चर्चेत असते. नुकतेच दोघे पालक झाले आहेत. कारण त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला आहे. काही दिवसांपूर्वी गॅब्रिएला चर्चेत आली होती कारण तिने डिलिव्हरीनंतर आपले वजन घटवले होते. आपला पूर्ण प्रवास तिने सोशलवर शेअर केला होता. आई झाल्यानंतर तिने अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो सोशलवर शेअर केले आहेत.

नुकतेच गॅब्रिएलाने तिचे काही नवीन फोटो सोशलवर शेअर केले आहेत. त्यामुळे गॅब्रिएला पुन्हा चर्चेत आली आहे. यातील तिच्या एका फोटोची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण या फोटोत ती फारच हॉट दिसत आहे. डेनिम जिन्स आणि जॅकेटमध्ये गॅब्रिएला खूपच बोल्ड दिसत आहे. यात तिच्या जिन्सची बटणं खुलीच आहेत. ती टॉपलेस दिसत आहे. कारण तिने केवळ जॅकेट घातलं आहे ज्याची बटणंही उघडी आहेत.

दोन महिन्यांपूर्वीच आई-वडिल बनले अर्जुन-गॅब्रिएला

18 जुलै 2019 रोजी अर्जुन आणि गॅब्रिएला पॅरेंट्स बनले आहेत. गॅब्रिएलाने एका मुलाला जन्म दिला आहे. तिच्या आई होण्याची माहिती प्रसिद्ध डायरेक्टर जेपी दत्ता यांची मुलगी निधी दत्ताने सोशलवरून दिली होती.

32 वर्षीय गॅब्रिएला अर्जुनपेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. चाहत्यांना तिचा हा टॉपलेस फोटो खूपच आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे की, असे वाटतच नाही की, ती आई बनली आहे. काहींनी कमेंट करत म्हटलं आहे, हॉट मम्मा.

https://www.instagram.com/p/ByppnT8hG-D/