NCB च्या चौकशी दरम्यानच देश सोडून गेला अर्जुन रामपाल

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) बड्या अभिनेत्यांची चौकशी करण्यात येत आहे. अभिनेता अर्जुन रामपाल याची सुद्धा NCB ने चौकशी सुरु केली. १६ डिसेंबरला NCB ने अर्जुनला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यातच आता अर्जुन देश सोडून गेल्याचे वृत्त समोर येत आहे.

यापूर्वी NCB ने अर्जुनची चौकशी करुन सोडून दिले होते. मात्र, पुन्हा चौकशी करण्यासाठी NCB ने अर्जुनला समन्स बजावले असून, त्यासाठी त्याने वकिलाच्या मार्फत २२ डिसेंबरपर्यंत वेळ वाढवून मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन सध्या परदेशात आहे. तो काही दिवसांपूर्वी कामानिमित्त लंडनला गेला आहे. म्हणूनच अर्जुनची प्रसारमाध्यांशी होणारी चर्चा ही रद्द झाली. सध्या अर्जुनचा ‘नेल पॉलिश’ नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

तथापि, चौकशीदरम्यान देश सोडून जाणारा अर्जुन हा पहिलाच कलाकार नसून, तत्पूर्वीही सपना पब्बीने देखील समन्स मिळाल्यानंतर लंडनला पलायन केले होते. नंतर तिने समाज माध्यमातून बोलताना सांगितले, ती NCB च्या परवानगीनंतर लंडनला आली आहे.