#KabirSinghTeaser : शाहिदच्या बंडखोर ‘कबीर सिंग’चा दमदार टीझर प्रदर्शित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अर्जुन रेड्डी हा दाक्षिणात्य चित्रपट तुफान गाजला. यानंतर हिंदी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची फारच उत्सुकता होती. आता अर्जुन रेड्डीचा हिंदी रिमेक कबीर खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता शाहिद कपूर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकताच आत कबीर सिंगचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझर मधील शाहिद कपूरने केलेला लुक हुबेहूब अर्जुन रेड्डीसारखाच दिसत आहे.

या चित्रपटात शाहिद कपूर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात एम. एस. धोनी आणि लस्ट स्टोरी मध्ये काम केलेली अभिनेत्री कियारा अडवाणी हिचाही अभिनय पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये कियाराची झलक पाहायला मिळत आहे. दरम्यान कियारा आणि शाहिद पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. टीझरमध्ये शाहिदच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळते. प्रेमातला वेडेपणा आणि प्रेयसी सोडून गेल्यानंतर व्यसनाधीन झालेला कबीर सिंग टीझरमध्ये दिसत आहे. शाहिदचा अभिनय लक्षवेधी ठरताना दिसत आहे.

अर्जुन रेड्डी या दाक्षिणात्य चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे संदीप रेड्डी वांगा यांनीच कबीर सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट 21 जून 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहिदचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आजच प्रदर्शित झालेल्या या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. रिलीज झाल्याच्या काळी वेळातच टीझरला 4 लाखांपेक्षा अधिक मिळाले आहेत.