Arjun Tendulkar Debut In IPL | अर्जुन तेंडुलकर करणार आयपीएलमध्ये पदार्पण ?; सरावावेळी टाकलेला यॉर्कर पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा व्हिडीओ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Arjun Tendulkar Debut In IPL | आयपीएलच्या (Tata IPL 2022) यंदाच्या हंगामामध्ये गतविजेता आणि पाचवेळा आयपीएलचा विजेता संघ असणाऱ्या मुंबई इंडिअन्सला (Mumbai Indians) अजून विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. मुंबईने या मोसमात सलग सहा महिने गमावले आहेत. गोलंदाजीमध्ये आता पहिल्यासारखी आक्रमकता राहिली नसल्याचं बोललं जात आहे. मात्र अशातच सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar Debut In IPL) अंतिम अकरामध्ये खेळणार असल्याचं बोललं जात आहे.

 

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar Debut In IPL) हा अष्टपैलू खेळाडू आहे, त्यामुळे मुंबईला तो उपयुक्त ठरू शकतो. मुंबईमधील जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) इतर गोलंदाजांची साथ मिळत नसल्याचं दिसत आहे. फॅबिअन ॲलनच्या (Fabian Allen) जागी अर्जुनला खेळवणार असल्याची माहिती समजत आहे. अर्जुनचा सरावादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

मुंबई इंडिअन्सने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे,
त्यामध्ये दिसत आहे की अर्जुनने गोलंदाजी करताना एक अफलातून यॉर्कर चेंडू टाकला आणि सराव करत असलेल्या फलंदाजाच्या दांड्या गुल झाल्या.
तो फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून मुंबई संघाचा सलमीवीर इशान किशन (Ishan Kishan) आहे.

 

दरम्यान, अर्जुनचा यॉर्कर चेंडू इतका अचूक जागी पडला की इशानला काही समजण्याच्या आत स्टम्प उडले.
मुंबईसुद्धा अशाच धारदार गोलंदाजाच्या शोधात आहे.
त्यामुळे आजच्या सामन्यात अर्जुन खेळतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Arjun Tendulkar Debut In IPL | arjun tendulkar superb yorker clean bowled ishan kishan mumbai indians most expensive player in mega auction ipl 2022 sachin tendulkar rohit sharma watch video

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा