‘अर्जुन तेंडुलकर’ दोस्त आपला मस्त… सांगतोय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 
पुण्यातील पिंपरी -चिंचवडच्या व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीचा धडाकेबाज फलंदाज पवन शहा याची १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.  याच निमित्ताने पोलिसनामाच्या टीम ने पवन शहा यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी बोलताना पवन आणि त्याचे प्रशिक्षक मोहन जाधव यांनी पोलिसनामाशी दिलखुलास गप्पा मारल्या.

यावेळी बोलताना पवन म्हणाला, तो वेंगसरकर अकादमी मध्ये वयाच्या दहाव्या वर्षांपासून खेळतो आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आहे. घरात कोणतीही क्रिकेटची पार्श्ववभूमी नसताना त्याला केवळ क्रिकेटची मनापासून आवड होती, त्यामुळे तो क्रिकेट मध्ये आल्याचे त्याने सांगितले.

[amazon_link asins=’B019MQLE20′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5b2f1d01-ac52-11e8-ad10-2f3ff4caaea1′]

पवन दहा वर्षांचा असताना अकादमीत आला होता. त्यावेळची आठवण त्याचे कोच मोहन जाधव यांनी सांगीतली.  ते म्हणाले ” पवन ला जेव्हा मी पहिल्यांदा अकादमीत पाहिले होते तेव्हा तो एका बाजूला बसून कुतूहलाने क्रिकेट पाहत होता. तेव्हा मी सहज त्याला विचारले “तुला क्रिकेट खेळायचे आहे का? तेव्हा तो लगेच तयार झाला आणि त्याने लगेच बॅटिंग पॅड घातले. त्यावेळी त्याने जेव्हा बॅट हातात घेतली तेव्हाच माझ्या लक्षात आले की, या मुलात  इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहे. आणि तेव्हापासूनच आम्ही त्याला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. त्यावेळी इतर खेळाडू १४ वर्षांखालील गटात खेळत होते, मात्र एकमेव पवन १० वर्षांचा होता “. आणि  त्याच्या करिअरची सुरुवात झाली.

[amazon_link asins=’B014R90AJA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6e2bf436-ac52-11e8-a209-214116a622cd’]

पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच

काही दिवसांपूर्वी १९ वर्षाखालील भारत आणि श्रीलंका दरम्यान कसोटी क्रिकेट सामना झाला होता. या दरम्यान भारतीय संघाने श्रीलंका विरुद्ध कसोटी मालिका २-० अशी जिंकली. या कसोटी सामन्यात भारताने ६१३ धावांचा डोंगर उभा केला होता. आतापर्यंतचा हा सर्वाधिक धावांचा विक्रम होता. याआधी २००६ साली पाकिस्तान विरुद्ध खेळताना ६११ धावा केल्या होत्या. या विक्रमात पवन चा मोठा हातभार होता. यात पवनने ३३२ चेंडूंमध्ये २८२ धावांची खेळी केली होती. ही त्याची पहिलीच आंतराष्ट्रीय मॅच होती. यावेळी पहिलीच आंतराष्ट्रीय मॅच असल्यामुळे थोडे दडपण हते असे तो म्हणाला. त्यावेळी तो लगेचच आऊट झाला. पण त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला एक विश्वास दिला, तू उत्तम खेळ, असे जेव्हा सांगितले तेव्हा मात्र पवन ने तब्बल ३३२ चेंडूंमध्ये २८२ धावांची खेळी केली.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’55d047fb-ac59-11e8-8e33-852ba5c27667′]

अर्जुन तेंडुलकर  दोस्त आपला मस्त … 
पवन आणि सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर एकत्र खेळतात. अर्जुन तेंडुलकर बाबत प्रसार माध्यमांमधून उलट सुलट चर्चा होत असते पण प्रत्यक्षात याबाबत पवन ला प्रश्न विचारला असता तो म्हणाला ” अर्जुन तेंडुलकर माझा खूप खास मित्र आहे. तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर चा मुलगा असला तरी इतर खेळाडूंप्रमाणेच वावरतो. तो खूप मेहनती आहे. एकदा एखादा निश्चय केला की ती गोष्ट केल्याशिवाय तो राहत नाही. आम्ही खूप धम्माल मस्ती करतो. असे पवन म्हणाला.
खट्याळ खोडकर पवन …

पवन बद्दल त्याचे कोच मोहन जोशी यांना विचारले असता. पवन खूप खट्याळ, खोडकर आणि अॅक्टीव्ह मुलगा असल्याचे त्यांनी सांगीतले. ते म्हणाले ” आम्ही जेव्हापासून पवन ला पाहतो तेव्हापासून पवन खूप मस्तीखोर आहे. पण मैदानावर मात्र तो खूप गांभीर्याने खेळतो. आता पुढचा प्लेयर कुठली चाल  खेळणार आहे हे त्याला आधीच समजते आणि त्याप्रमाणे तो आपली चाल बदलतो आणि खेळतो. हा त्याच्यातला अतिशय उत्तम गुण  आहे, असे मोहन जाधव यांनी सांगितले. कधी कधी हे सगळे मिळून इतके मस्ती करतात की आम्हाला नाकीनऊ आणतात, असे सांगायला देखील जाधव विसरले नाहीत.

जाहिरात