अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळचा लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या वतीने सत्कार

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – येथील शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय व जिजामाता प्राथमिक यांच्या संयुक्त विद्यमाने अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ यांचा सत्कार करण्यात आला.

अतिशय गरीब कुटुंबातून सैन्यदलात दाखल होऊन ऑलिंम्पिक, अशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या व पुढेही अशीच प्रगती करत क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी व पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये आपल्या देशाला सुवर्णपदक प्राप्त करून द्यावे या उद्देशाने शाब्बासकीची थाप म्हणून छोटेखानी सत्काराचे आयोजन करण्यात आले.

चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे वास्तव्यास असणारा दत्तू भोकनळ हा रिओ ऑलिम्पिक मध्ये उपांत्य फेरी गाठणारा भारताचा पहिलाच रोइंग पटू ठरला आहे. केंद्र शासनाचा अतिशय मानाचा अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. या सत्कारप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, संचालिका निताताई पाटील, शंतनू पाटील, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, प्राचार्य विश्वासराव पाटील, मुख्याध्यापिका संजीवनी पाटील, मुख्याध्यापक अनिस काझी, पर्यवेक्षक दत्तू गांगुर्डे, सुधाकर सोनवणे सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते.