राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर ; कोल्हापुरात खुशीची लाट 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

आशियाई स्पर्धेत सुवर्णपद विजेती कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे . राही २५ मीटर पिस्तुल नेमबाजी प्रकारातील आंतरराष्ट्रीय ख्यातीची नेमबाज आहे . तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने करवीरनगरीत पुन्हा एकदा खुशीची लाट पसरली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’772e34ef-bca6-11e8-adab-f1a3dfc0f978′]

राहीने जकार्ता येथे झालेल्या यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन तिला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे . महाराष्ट्र रायफल असोसिएशनसह क्रीडाप्रेमींनी राहीवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
कोल्हापुरात  नेमबाजीचे प्राथमिक प्रशिक्षण घेतलेल्या राहीने २५ मीटर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत  ठसा उमटवला आहे . २००८  मध्ये झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत तिने पहिले सुवर्ण पदक मिळविले. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.

राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अर्जुन पुरस्कार दिला जातो. अर्जुन पुरस्कार देण्याची प्रथा भारत सरकारने १९६१ मध्ये सुरू केली. ३ लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.