चर्चमधील पवित्र पेटारा वाचवण्याच्या प्रयत्नात 800 भाविकांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   सेंट मेरी चर्चमधील पवित्र पेटारा लुटण्यासाठी आलेल्या लुटारूंनी केलेल्या तुफान गोळीबारात 800 जणांचा मृत्यू झाला आहे. इथिओपियामधील तिगरे क्षेत्रात नोव्हेंबर महिन्यात ही भयावह घटना घडली आहे.

गेटू नावाच्या एका प्राचार्याने येथील भयावह घटनेची माहिती देताना सांगितले की, ख्रिस्ती धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणा-या Ark of Covenant (पवित्र पेटारा) चोरी करण्यासाठी चोरटे आले होते. त्यावेळी चर्चमध्ये लोकांची मोठी गर्दी होती. गर्दी पांगवण्यासाठी लुटारूंनी तुफान गोळीबार केला. लोकांनी गोळीबाराचा आवाज ऐकून चर्चमध्ये असलेल्या आणि पवित्र आर्कचे रक्षण करणाऱ्या पादरींच्या मदतीसाठी धावले. मात्र यात अनेकांना जीव गमवावा लागला. नोंव्हेंबर महिन्यात इथिओपियाचे पंतप्रधान आबिय अहमद यांनी इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्कची सेवा बंद केली होती. त्यामुळे इथिओपियाचे संपूर्ण जगासोबतचा संपर्क तुटला होता. नोव्हेंबर महिन्यात या परिसरात तणाव वाढू लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. येथील चर्चमधील पवित्र पेटारा दुसऱ्या शहरात नेला जाईल आणि नंतर नष्ट केला जाईल, अशी भीती त्यांना वाटत होती. दरम्यान, येथे आलेल्या लुटारूंनी लोकांवर कुठलीही दयामाया दाखवली नाही. त्यांनी तुफान गोळीबार करून लोकांना ठार मारले.

तिगरे पीपल्स लिबरेशन आर्मीने इथिओपियावर सुमारे 27 वर्ष राज्य केले होते. मात्र तिगरे या भागाची लोकसंख्या ही इथिओपियाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 6 टक्के एवढीच आहे. मात्र या विभागाचे राष्ट्रीय राजकारणावर वर्चस्व राहिले आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि मानावधिकारांच्या हननाच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे तिगरे पीपल्स लिबरेशन फ्रंटच्या सरकारबाबत नाराजी वाढली आणि 2018 मध्ये पंतप्रधान आबिय अहमद सत्तेवर आले.