‘करिश्मा-करीना’ च्या भावानं शेअर केले लग्नातील ‘मोहक’ फोटो, पत्नी अनीसाबद्दल अरमान म्हणतो…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अरमान जैन आणि त्याची गर्लफ्रेंड अनीसा मल्होत्रा 3 फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाले. मोठ्या धुमधडाक्यात हे लग्न पार पडलं. या लग्नात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या लग्नात बिग बी अमिताभ बच्चन सहित बिजनेसमन अनिल अंबानी आले होते. अरमाननं लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत.

अरमाननं इंस्टाग्रामवरून लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना अरमाननं खास असं कॅप्शनही दिलं आहे. आज आपण दोघांची लव स्टोरी जाणून घेणार आहोत.

अनीसा पंजाबी – पारसी फॅमिलीतून आहे. तिनं न्यूयॉर्कमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. जेव्हा अनीसा अरामानच्या शुटींगच्या सेटवर दिसू लागली तेव्हा दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी वेग धरला.

जेव्हा अरमानला याबाबत विचारलं गेलं होतं तेव्हा अरमाननं ही गोष्ट नाकारली होती. परंतु एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यानं म्हलं होतं की, दोघंही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. दोघांनीही कॅथेड्रल अँड जॉन केनन स्कुल, फोर्टमध्ये सोबत शिक्षण घेतलं आहे.

अरमान सांगतो की, “ती 3 वर्षांची होती तेव्हा पासून मी तिला ओळखतो. आम्ही सोबतच लहानाचे मोठे झालो आहोत.”