अरमान कोहलीला उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

प्रेयसीला मारहाण केल्याचा आरोप असलेला अभिनेता अरमान कोहली याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला. आपल्यावरील गुन्हा रद्द व्हावा, यासाठी कोहलीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. केलेल्या कृत्याचा आपल्याला पश्चात्ताप होत आहे, असेही कोहलीने न्यायालयाला सांगितले.  नीरु रंधवा हिनेही प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्याला पुढे केसचालविण्याची इच्छा नसल्याचे सांगितल्याने न्यायालयाने अरमान कोहलीवरील गुन्हा रद्द करत त्याची तुरुंगातून सुटका करण्याचा आदेश तुरुंग प्रशासनाला दिला आहे.

पीडिता नीरू रंधवा हिने ही केस पुढे चालविण्याची इच्छा नसल्याचे सांगितल्याने गुन्हा रद्द करणे योग्य ठरेल, असे न्या. आर.एम. सावंत व न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने म्हटले. अरमान कोहलीने पुन्हा असे आपण वागणार नाही, असे आश्वासनही न्यायालयाला दिले.

शुक्रवारच्या सुनावणीत स्वत: नीरू रंधवा न्यायालयात उपस्थित होती. तिने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात तिने कोहलीत आणि तिच्यातील वाद सामंजस्याने सुटल्याचे न्यायालयाला सांगितले. ह्यकोहलीचे कुटुंबीय आणि आमच्या मित्रांच्या मध्यस्थीने हा वाद सुटला आहे. कोहलीच्या कुटुंबाने नुकसानभरपाई दिली असून आणखी काही ह्यपोस्ट डेटेडह्ण चेक्स मिळणार आहेत,ह्ण असे तिने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

नीरू रंधवाला मारहाण केल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अरमान कोहलीला १२ जून रोजी लोणावळ्याहून अटक केली. त्यानंतर त्याला वांद्रे दंडाधिका?्यांपुढे हजर करण्यात आले. दंडाधिकाºयांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचबरोबर त्याचा जामीन अर्जही फेटाळला.

नीरू रंधवाच्या तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलिसांनी कोहलीवर आयपीसी ३२३, ३२६,५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदविला.

दोन लाखांचा दंड

न्यायालयाने कोहलीने दिलेले आश्वासन मान्य करून त्याच्यावरील गुन्हा रद्द केला असला तरी त्याला सामाजिक कामासाठी दोन लाख रुपये दंड ठोठावला आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या शाखेसाठी एक लाख रुपये देणगी व नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडलाही एक लाख रुपये देणगी म्हणून देण्याचा आदेश दिला आहे.

‘जानी दुश्मन’ फेम अरमान कोहलीची गर्लफ्रेंडला बेदम मारहाण

अभिनेता अरमान कोहलीला लोणावळ्यातून अटक

गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी अरमान कोहलीचा जामीन अर्ज फेटाळला