शेगाव येथे सशस्त्र दरोडा, सहा लाखाचा ऐवज लंपास

येळवी : पोलीसनामा ऑनलाईन-जत तालुक्यातील शेगाव येथे साहेबराव विठ्ठल शिंदे यांच्या घरावर मंगळवारी (दि.२०) पहाटे तीनच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. हा दरोडा पाच ते सात जाणांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून तीन लाख रोख रक्कम व सात तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल असा एकूण सहा  लाख रुपयेचा ऐवज चोरुन नेला. तसेच साहेबराव शिंदे व त्यांच्या पत्नी वर्षाराणी शिंदे यांना दरोडेखोरांनी मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, साहेबराव शिंदे यांचे शेगाव येथे सिमेंट विट व पल्बिंग साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. तसेच ते शेगाव ग्रामपंचायत सदस्य आहेत. शेगावामध्ये पत्नी व दोन मुलांसह राहतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री शिंदे कुटूंबीय आपल्या घरी झोपेत असतानाच रात्री तीन वाजणेच्या सुमारास दरवाजा वाजण्याच्या आवाज साहेबरावांना आला. काही समजण्याच्या आताच चोरट्यांनी दरवाजावर मोठा दगड टाकून दरवाजा फोडला व पाच ते सात तरुण चोरट्यांनी आत प्रवेश केला.

पाच ते सातजणांनी पायात पांढरे बुट, हातात मोजे काळे जरकीन तोंडाला पांढरा कपडा बांधला होता. या चोरट्यांनी पती व पत्नीस मारहाण करत वर्षाराणी यांच्या गळ्यातील दगिने (मणी मंगळसूत्र, कानातील कर्णफुले, हातातील बांगड्या) व साहेबराव यांच्या हातातील अंगठ्या व मोबाईल हिसकावून घेतले व साहेबराव यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर डोक्याला लावत तीन लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली. यावेळी झालेल्या मारहाणीत साहेबराव व त्यांच्या पत्नीच्या हाताला, पाठीत गंभीर जखमा झाल्या आहेत.