भरदिवसा रस्त्यावर पैशांचा ‘धो-धो’ पाऊस, लोकांची ‘चंगळ’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्त्यावर प्रवास करत असताना अचानक पैशाचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली तर, असाच एक प्रकार सत्यात उतरला. अमेरिकेतील जॉर्जिया येथील राजधानी अटलांटामध्ये एका हायवेवर पैशांच्या पाऊस पडला.काय घडला प्रकार
अमेरिकेतील अटलांटामधील एका महामार्गावर हा प्रकार घडला. महामार्गावर डॉलर वाहून नेणाऱ्या ट्रकचा दरवाजा उघडा राहिल्याने गाडीतील सर्व डॉलर हवेत उडाले. हवेत उडणारे हे डॉलर रस्त्यावर परसले. रस्त्यावर पैशाचा पाऊस पडल्याने लोकांची चंगळ उडाली. पैसे जमा करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोमाने व्हायरल झाला.

प्रत्यक्ष दर्शीने सांगितले की, एका गाडीतून अचानक नोटा हवेत उडाल्या, त्या रस्त्यावर जमा झाल्याने लोक या नोटा जमा करण्यासाठी उतरले. बराच वेळ या गाडीतील लोकांना याची कल्पनाच नव्हती. जेव्हा त्या लोकांना याचा पत्ता लागला तो पर्यंत सर्व नोटा रस्त्यावर जमा झाल्या होत्या. रस्त्याने ये जा करणाऱ्या लोकांनी आपल्या गाड्या रस्त्यांचा कडेला लावल्या आणि डॉलर उचलण्यासाठी तुटून पडले.

१ कोटी रुपये उडाले हवेत
डाऊनवूड पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, वाहन चालक आणि संबंधित लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे १ कोटी २० लाख रुपये हवेत उडून रस्त्यावर आले. यातील १ लाख डॉलर जप्त करण्यात पोलिसांना यश आले. तब्बल ७५ हजार डॉलर घेऊन लोकांनी पळ काढला. अनेकांनी स्वत: पोलिसांना डॉलर परत आणून दिले आहेत. पोलीस व्हिडिओ पाहून लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरु केले आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like