पाकिस्तानकडून शस्त्रीसंधीचे उल्लंघन, चकमकीत 2 जवान शहीद तर एका नागरिकाचा मृत्यू

पुलवामा : वृत्त संस्था   जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील तंगधार नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत जोरदार बॉम्ब वर्षाव व गोळीबार केला. या गोळीबारात सुरक्षा दलाचे २ जवान आणि एका नागरिकांचा मृत्यु झाला आहे. या गोळीबारात ३५ नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. शनिवारी रात्री १० वाजता नियंत्रण रेषेपलिकडून नागरी भागात गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यात एका नागरिकाला गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला. पाकिस्तानकडून रात्रभर नियंत्रण रेषेजवळील नागरी भागात गोळीबार केला जात होता. त्याला भारतीय जवानांनी प्रत्युत्तर दिले.

रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी सेनेने तंगधार येथील एका भारतीय सेनेच्या पोस्टला निशाणा बनविले. त्यात दोन जवान शहीद झाले आहे. भारतीय सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या या गोळीबाराला प्रतिउत्तर देत आहेत.

 

visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like