Coronavirus : परिस्थितीचा ‘सामना’ करण्यासाठी आमच्याकडं 6 तासाचा ‘प्लॅन’ तयार, ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर लष्कर प्रमुखांनी सांगितलं

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – भारतात कोरोना व्हायरसने संक्रमितांची संख्या सतत वाढत आहे. यादरम्यान लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे म्हणाले आहेत की, कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सैन्य पूर्णपणे तयार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत लढण्यासाठी पूर्णपणे झोकून देतील. तसेच ते म्हणाले की, केवळ ६ तासाच्या सूचनेवर आयजोलेशन वॉर्ड आणि आयसीयू तयार करू शकतात. नरवणे यांच्यानुसार, जेव्हा केव्हा सैन्याला लोकांच्या मदतीसाठी बोलावले जाईल ते ताबडतोड येतील.

४५ बेडचा आयजोलेशन वॉर्ड
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, क्विक रिऍक्शन टीम कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी तयार आहे. ते म्हणाले की, आम्ही केवळ ६ तासाच्या सूचनेवर ४५ बेडचा एक आयजोलेशन वॉर्ड तयार करू शकतो. सोबतच १० बेडचा आयसीयू वॉर्डही तयार करू शकतो. याशिवाय सर्व्हिलन्स आणि आयजोलेशनची उत्पादकता देखील वाढवू शकतो.

दररोज बैठक होते
नरवणे यांच्यानुसार, सैन्य प्रत्येक दिवसाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. त्यांनी म्हटले की, त्यांचे सगळे आर्मी कमांडर, प्रिन्सिपल स्टाफ ऑफिसर आणि ऍडवायजर सतत बैठक घेऊन या मुद्द्यावर चर्चा करत आहेत. मागच्या २-३ महिन्यात सैन्याला वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग दिली जात असून ते स्वतः याचा आढावाही घेत आहेत. तसेच त्यांनी भारताचे पुढचे काही आठवडे महत्वाचे असल्याचे सांगितले.

राजनाथ सिंह यांनी केले कौतुक
मागच्या काही दिवसात बैठकीदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर आणि हवाई दलाचे खूप कौतुक केले होते. आतापर्यंत परदेशातून आणलेल्या १४६२ लोकांना सैन्याच्या देखरेखीखाली ठेवले गेले आहे. ज्यामधील ३८९ लोकांना आयजोलेशन पूर्ण झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे. सध्या मानेसर, हिंडन, जैसलमेर, जोधपूर आणि मुंबई येथे सैन्याने १०७३ जणांची देखभाल केली जात आहे.