कुटूंबातील चौथ्या पिढीची सैन्य अधिकारी ‘तान्या शेरगिल’नं रचला ‘इतिहास’, राजपथावर केलं पुरूष बटालियनचं ‘नेतृत्व’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सैन्य दलाच्या जवानांनी दरवर्षीप्रमाणे परेडमध्ये भाग घेतला. परंतु २६ वर्षांच्या महिला सैन्य अधिकाऱ्याच्या उपस्थितीने या परेडला अधिक खास केले. प्रजासत्ताक दिनाच्या या परेडमध्ये आपल्या कुटुंबातील चौथ्या पिढीची सैन्य अधिकारी तान्या शेरगिल यांनी भाग घेतला. त्यानंतर आता तान्याची छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

तान्या या भारतातील पहिल्या महिला अधिकारी आहे ज्यांनी परेडमध्ये सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व केले. तान्या शेरगिल पंजाबच्या होशियारपूरच्या असून सैन्याच्या सिग्नल काॅर्प्समध्ये कॅप्टन आहे. कॅप्टन शेरगिलला चौथ्या पिढीच्या अधिकारी म्हटले जाते कारण त्यांच्या आधी कुटुंबातील इतर तीन सदस्यांनी सैन्यात राहून देशाची सेवा केली आहे. तान्याचे पणजोबा, आजोबा आणि वडीलही सैन्यात होते.

तान्या म्हणाल्या की यापूर्वी अशा कोणत्याही सोहळ्यात त्यांनी भाग घेतला नव्हता. पण लहानपणापासूनच एके दिवशी परेडमध्ये भाग घेण्याची त्यांची इच्छा होती. तान्या यांनी सांगितले की, गणवेश घातल्यानंतर त्या फक्त एक अधिकारी आहे. हे चित्र प्रत्येकाच्या मनात राहील.’ जेव्हा त्यांना सैन्यात महिलांच्या भूमिकेबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या कि, ‘बऱ्याच महिला माझ्यापेक्षा चांगली कामगिरी करत आहेत. मी बर्‍याच महिलांना माझे प्रेरणास्थान मानते. तान्या पुढे म्हणाल्या कि, ‘जर एक छोटी मुलगीदेखील माझ्याकडून प्रेरणा घेते तर माझ्यासाठी यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असू शकते.’ सैन्यात भरती होण्यापूर्वी तान्या यांनी नागपूर विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात बीटेक केले आहे.

आपल्या मुलाखतीत तान्या म्हणाल्या की, गुणवत्तेच्या जोरावर त्या सैन्यात दाखल झाल्या आहे. पर्वतारोहणाचा कोर्स घेऊन पदोन्नती परीक्षेची तयारी करणे ही त्यांची पुढील योजना आहे.

फेसबुक पेज लाईक करा –