इराण सारखी ‘चूक’ होणार नाही, भारतानं ‘योग्य’ पाऊल उचललं, लष्कर प्रमुख नरवणेंचा ‘दावा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी भारतीय एअर डिफेन्स कमांडची जोरदार बाजू मांडली आहे. नरवणे यांनी म्हटले आहे की, एअर डिफेन्स कमांडमुळे भारताकडून इराणसारखी चूक होणार नाही. 8 जानेवारीच्या सकाळी राजधानी तेहरानजवळ उड्डाण केल्यानंतर लगेचच यूके्रनचे एक प्रवाशी विमान कोसळले होते. नंतर इराणने म्हटले की, इराणी लष्कराने चुकीने मिसाईल सोडल्याने हे विमान कोसळले. या विमानात 176 प्रवाशी होते, सर्व प्रवाशांचा यात मृत्यू झाला.

इराणने शनिवारी सार्वजनिकरित्या जाहीर केले की आपल्या चुकीमुळे प्रवाशी विमान पाडण्यात आले. इराणला हे विमान लष्करी असल्याचे वाटले. आता भारताचे लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी म्हटले आहे की, एअर डिफेन्स कमांड असल्याने भारत अशी चूकी करू शकत नाही.

चीफ ऑफ डिफेंस स्टाफ पद स्वीकारताच बिपीन रावत यांनी लष्कराच्या सर्व विभागांना निर्देश दिले होत की, त्यांनी भारताच्या आकाशाच्या सुरक्षिततेसाठी 30 जूनपर्यंत एअर डिफेन्स तयारीचा आराखडा सादर करावा.

एअर डिफेन्स सिस्टममुळे होणार नाही इराणसारखी घटना
लष्कर प्रमुखांनी सांगितले की, एअर डिफेन्स कमांड हे योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे. यामुळे इराणसारखी घटना घडणार नाही, हे निश्चित होते. आर्मी डेच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मला वाटते जर आपण सर्व प्रयत्न केले तर अशा चूका होणार नाहीत.

आपल्याच आकाशात लष्करी विमान समजून इराणने केला हल्ला
8 जानेवारीला जेव्हा इराणने इराकमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता, तेव्हा इराणचे हवाईदल सावध झाले होते. इराणने हा हल्ला जनरल कासिम सुलेमानीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी केला होता. याच वेळेला तेहरानहून यूक्रेनसाठी एका विमानाने उड्डाण घेतले. गडबडीत इराणने या विमानावर मिसाईल सोडले. यामुळे विमानातील 176 प्रवाशी मृत्यूमुखी पडले. नंतर इराणने आपली चूक कबुल केली.

बालाकोटनंतर भारतानेही केली होती चूकी
2019 मध्ये दुर्दैवाने भारताने अशी चूकी केली होती. 26 फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ला केला होता. दुसर्‍याच दिवशी पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, यादरम्यान भारताने काश्मीरमध्ये हवाई दलाचे आपलेच एक हेलिकॉप्टर पाडले होते. ते एमआय -17 एयरक्राफ्ट होते. या दुर्घटनेत हवाई दलाचे 6 अधिकारी मृत्यूमुखी पडले होते. तत्कालीन एअर चीफ मार्शल यांनी यास सर्वात मोठी चूक म्हटले होते. आता जवळपास वर्षभराच्या अंतराने इराणनेसुद्धा अशीच चूक केली आहे.

सध्या हवाई दलाची जबाबदारी एयर डिफेंसकडे आहे. परंतु, नेव्ही आणि लष्कराची वेगवेगळी एयर डिफेन्स सिस्टम आहे.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी तिन्ही सेना दलांसाठी एकच एअर डिफेन्स सिस्टम बनविण्याचे ठरविले आहे. यामुळे लष्कराच्या तिन्ही विभागांचे एकाच ठिकाणी नियंत्रण झाल्यास कोणतीही गडबड होणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/