‘पाकिस्तानमध्ये पुन्हा कारगिलसारखे युद्ध करण्याची हिम्मत नाही’ : जनरल बिपिन रावत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १९९९मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये चौथे युद्ध म्हणजे कारगिलचे युद्ध झाले. या युद्धाला २० वर्ष झाले आहेत. त्यावर सेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान करगिलसारख्या घटनेचा पुनरावृत्ती करणार नाही, असा दावा बिपिन रावत यांनी केला आहे.

आम्ही असे कोणतेही क्षेत्र ठेवले नाही ज्यावर आमचे लक्ष नाही. आमचे लक्ष सर्वत्र आहे. पाकिस्तानने यापूर्वी अनेकदा घुसखोरी केली आहे. मात्र आता पुढील अनेक वर्ष तरी पाकिस्तान कोणत्याही प्रकारची घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केले.

जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे सेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांनी लाईन ऑफ कंट्रोल्स (एलओसी)च्या सीमांवर तटरक्षा व्हावी यासाठी तेथील अभ्यास करत दहशतवाद्यांविरोधात तयारी केली आहे. बीपिन रावत यांनी व्हाइट नाइट कॉर्प्स येथे भेट देऊन पाकिस्तानने सीजफायरचे उल्लंघन केल्यावर पाकिस्तानला प्रतित्युत्तर देण्याबाबत तसंच इतर तयारीविषयी माहिती घेतली होती.

दरम्यान, पाकिस्तानवर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानला चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान भारतावर आक्रमन करण्याविषयी विचारही करू शकणार नाही, हे नक्की.

https://twitter.com/ANI/status/1147031369605926912

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार