दहशतवादी कॅम्प बाबतच्या पाकिस्तानच्या दाव्यावर अजिबात विश्‍वास नाही : लष्कर प्रमुख बिपिन रावत

दिल्ली : वृत्तसंस्था – सातत्याने दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने आत्तापर्यंत दरवेळी या पाठिंब्याबद्दल त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांना नाकारताना हात वर केले आहेत. पण आता बालाकोट एअर स्ट्राईक नंतर मात्र आम्ही पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्याचे अड्डे नष्ट करत सर्व दहशतवादी कॅम्प बंद करणार असल्याचे पाकिस्तान सांगत आहे.

भारतीय सैन्यदलाने याबाबतीत सावध पवित्रा घेत पाकिस्तानच्या दाव्यावर अजिबात विश्वास नसून पाकिस्तान याबतीत दिखावा करत आहे. त्यामुळे कसलाही गाफीलपणा करणार नसून भारतीय सैन्यदल सातत्याने दक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात विचारले असता भारतीय सैन्यदलाचे चीफ जनरल बिपीन रावत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

काय म्हणले बिपिन रावत ?
पाकिस्तान दहशतवाद्यांची पाठराखण करण्याच्या आरोपांचा नेहमीच इन्कार करतो जेव्हा या मुद्द्यावरून अमेरिका आणि भारताचा दबाव वाढतो तेव्हा मात्र दरवेळी अशा प्रकारे कठोर कारवाई करण्याचा दिखावा करतो. हे पाहिस्तानचे नेहमीचे नाटक असून पाकिस्तान खरोखरच दशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करतो आहे का याची सत्यता पडताळणी करणे अवघड आहे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे केवळ एकदोन नाही तर मोठ्या प्रमाणावरअड्डे असून खूप मोठ्या प्रमाणावर याठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन आणि हत्यारे पुरवून घातपाताच्या कारवाया करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये पाठविले जाते.मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असणार हाफिज सईद पाकिस्तानातील शहरांमध्ये फिरून रॅलींचे आयोजन करतो आणि भारताविरोधात पाकिस्तानी जनतेला भडकवतो.

मौलाना मसूद अजहर देखील पाकिस्तानमध्ये खुलेआम फिरतो.हे दोघांचेही पाकव्याप्त काश्मीरमध्ये नेहमी येणेजाणे असते. अशा प्रकारे घातक दहशतवाद्यांना दिली जाणारी सूट पाकिस्तानचा खोटेपणा उघड करते आणि त्यांचे खरे हेतू यातून स्पष्ट असेही रावत म्हणाले.

मालदीवच्या संसदेत मोदींनी देखील साधला पाकिस्तानवर निशाणा:
दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर असणाऱ्या नरेंद्र मोदींनी देखील मालदीवच्या संसदेमध्ये नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. पंतप्रधानांनी यावेळी दहशतवाद्यांच्या आव्हानाचा सामना करण्यासाजाठी सर्वांनी एक होऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा सांगितले. असे असताना काही लोक मात्र चांगले दहशतवादी आणि वाईट दहशतवादी असा फरक करण्याची गंभीर चूक करत असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर टीका केली.

एवढी मदत मिळते कुठून ?
दहशतवाद्यांकडे बँक खाते नाही, हत्यारांचा कारखाना नाही कि स्वतःहून पैसे छापण्याची सुविधाही नाही. असे असताना देखील त्यांना काहीच कमी पडत नाही. त्यांना हे सगळे कोण पुरवते असे विचारत मोदींनी पाकिस्तानकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवले.

ते पुढेम्हणाले, दहशतवादी कारवायांमुळे एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव गेला नाही असा एकही दिवस जात नाही. दहशतवादाचा हा धोका केवळ एखादा देश अथवा विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी घातक आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

कमी झोप घेऊन जास्त काम करणे शरीरासाठी घातक

दुर्लक्ष करू नका, ‘सायलेन्ट हार्ट अटॅक’ची लक्षणे जाणून घ्या

सुष्मिता सेनने ‘या’ जीवघेण्या आजारावर केली जिद्दीने मात

‘हे’ पदार्थ चुकूनही ठेवू नका तांब्याच्या भांड्यात, ठरू शकतात विषारी