PoK मध्ये अजूनही 20 कॅम्पमध्ये 350 पेक्षाही जास्त दहशतवादी, लष्कर प्रमुखांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेला आहे. लष्कर प्रमुखांनी दावा केला की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये 15 ते 20 दहशतवादी कॅम्प असू शकतात. एवढेच नव्हे तर या कॅम्पमध्ये 250 ते 350 दहशतवादी असू शकतात. हा केवळ अंदाज आहे. दहशतवाद्यांची संख्या यापेक्षा जास्त असू शकते.

नरवणे म्हणाले की, जर फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने दखल घेतली तर त्यांच्यावर दबाव येऊ शकतो. त्यांना त्यांची वक्तव्य आणि दहशतवादी हालचालींवर विचार करावा लागू शकतो. खोर्‍यात मागच्या काही दिवसात दहशतवादी हालचालींमध्ये झालेली घट एफएटीएफमुळे सुद्धा असू शकते.

चीनला सुद्धा माहित आहे प्रत्येकवेळी साथ देऊ शकत नाही
एफएटीएफद्वारे पाकला ग्रे लिस्टमध्ये टाकण्याच्या शक्यतेबाबत लष्कर प्रमुखांनी सांगितले की, चीनला सुद्धा या गोष्टीची जाणीव आहे की, तो आपल्या सर्वात खास मित्राची प्रत्येकवेळी साथ देऊ शकत नाही.

पाकचे नापाक हेतू उध्वस्त करण्यास सक्षम
लष्कर प्रमुख नरवणे म्हणाले, आमच्याजवळ पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांबाबत अनेक इनपुट आहेत. परंतु, आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही पाकिस्तानी बॅट कारवाईला उध्वस्त करण्यास सक्षम आहोत.

दहशतवादामुळे पाक संकटाच्या सावटाखाली
एफएटीएफमध्ये पाकिस्तानला प्रथम ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा विचार करण्यात आला होता. परंतु, नंतर त्यास काही कालावधीची संधी देण्यात आली. आता असे म्हटले जात आहे की त्यांना आता ग्रे लिस्टमध्ये टाकले जाऊ शकते. मलेशिया आणि तुर्कीच असे दोन देश आहेत जे पाकला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यास विरोध करत आहेत. परंतु, असे म्हटले जात आहे की, पाकिस्तानला तरीसुद्धा ग्रे लिस्टमध्ये टाकले जाऊ शकते. जर पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले तर अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या पाकची आवस्था आणखी गंभीर होऊ शकते.

You might also like