लष्कर प्रमुख झाल्यानंतर पहिल्यांदाच नरवणेंचा LoC दौरा, जवानांना कोणत्याही आव्हानांना तयार राहण्यासाठी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेना प्रमुखाचा कार्यभाग स्वीकारल्यानंतर जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी पहिल्यांदाच एलओसीची पाहणी केली. यावेळी नरवणे यांनी जवानांच्या भेटी घेतल्या आणि एकंदरीतच परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी जवानांना कोणत्याही अडचणींना तयार राहण्यासाठी सांगितले. जनरल नरवणे यांनी 1 जानेवारीला लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आणि सध्या ते नव्याने तयार झालेल्या दोन दिवसांच्या केंद्रशासित प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी येथे राजभवनात लेफ्टनंट गव्हर्नर जीसी मुर्मू यांची भेट घेतली आणि अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचे प्रभावी व्यवस्थापन, विशेषत: घुसखोरीचे प्रयत्न आणि दहशतवादविरूद्ध सुरू असलेल्या कारवाई संदर्भात चर्चा केली.

यावेळी सेना प्रमुखांसोबत लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह देखील होते. यावेळी सेना प्रमुखांनी सैनिकांना आपल्या कर्तव्याची आठवण करून दिली आणि त्यासाठी तत्परता दाखवण्यासाठी प्रेरित देखील केले.

आदल्या दिवशी सेनाप्रमुख उधमपूर येथील नॉर्दन कमांड मुख्यालयाला भेट दिली. जेथे त्यांना लेफ्टनंट जनरल रणवीर सिंह यांनी एलओसी वरील सद्यस्थितीबद्दल माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार जनरल नरवणे यांनी शत्रूने निर्माण केलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. राजभवतातील एका प्रवक्त्याने सांगितले की, सेना प्रमुखांच्या भेटीदरम्यान मुर्मू यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत लष्कर, अन्य सुरक्षा दले आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचे कौतुक केले.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like