नवे लष्कर प्रमुख नरवणे यांचं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारनं आदेश दिल्यावर PoK वर कब्जा करू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्काराचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी सांगितले की संसदेला हवे असेल तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई करण्यात येईल. लष्कर प्रमुख म्हणाले की हा एका संसदीय संकल्प आहे की संपूर्ण काश्मीर भारताचा भाग आहे. जर संसदेने सांगितले की पाकव्याप्त काश्मीर देखील आपला झाला पाहिजे आणि आम्हाला याचे आदेश देण्यात आले तर आम्ही त्यासाठी कारवाई करु.

देशाचे नावे लष्कर प्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांनी शनिवारी सांगितले की सियाचिन आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत सांगितले की देशातील सुरक्षा आपली प्राथमिकता आहे, सुरक्षेबाबत कोणताही दुर्लक्ष केले जाणार नाही.

लष्कर प्रमुख म्हणाले की सीडीएसने बनणे महत्वाचे पाऊल आहे, सीडीएसच्या गठणाने सैन्य मजबूत होईल. ते म्हणाले की तीन सेनादलात ताळमेळ आवश्यक आहे. आपण भविष्यातील धोक्यावर लक्ष देऊन नियोजन करु आणि प्राथमिकतेने विचार केला जाईल.

लष्कर प्रमुख म्हणाले की आम्ही क्वॉन्टिटीवर लक्ष देऊन गुणवत्तेवर लक्ष देत आहोत. पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तान सेनेद्वारे होणाऱ्या निर्दोष नागरिकांच्या हत्त्येवर नरवणे म्हणाले की, आम्ही या कारवायांचा सहारा घेणार नाही आणि एका अत्यंत प्रतिष्ठीत सैन्याच्या रुपात लढतो.

ते म्हणाले की, भारतीय सैन्य आज पहिल्याच्या तुलनेत आधिक उत्तम आहे. सीडीएसची नियुक्ती आणि सैन्याच्या प्रकरणात विभागाची निर्मिती एकीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल आहे. पाकिस्तान आणि चीन सीमेवर सेन्याचे संतुलन करणे आवश्यक आहे असेही नरवणे म्हणाले. संतुलनाची आवश्यकता आहे कारण उत्तर आणि पश्चिम सीमेवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/