लष्करप्रमुख नरवणे 3 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे (Manoj Mukund Naravane) हे 3 नोव्हेंबरपासून नेपाळच्या (Nepal) 3 दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. नेपाळशी असलेले संबंध आणखी मजबूत करण्यासाठी ते या हिमालयीन देशाच्या दौऱ्यावर जात आहेत. नेपाळी समपदस्त जनरल पूर्णचंद्र थापा (Purna Chandra Thapa) यांच्यासह नेपाळेच ज्येष्ठ लष्करी आणि इतर अधिकरांनी यांच्यासोबत ते या दौऱ्यात चर्चा करणार आहेत. दोन्ही देशात सुमारे 1800 किमी लांबीची सीमा आहे. त्यांचे व्यवस्थापन, सहकार्य अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते व्यापक चर्चा करणार आहेत.

उच्चस्पद सरकारी सूत्रांनी सांगितलं की, लष्करप्रमुख ननवरे हे दोन्ही देशातील संरक्षण आणि संरक्षणाच्या क्षेत्रातील संबंध आणखी मजबूत करण्याच्या उद्देशानं नेपाळचा दौरा करणार आहेत.

नेपाळनं मागील मे महिन्यात एक वादग्रसत नकाशा जारी करून भारताचा काही भाग त्या देशात दाखवला होता. तेव्हापासून दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्हींमधील हा पहिला उच्चस्तरीय दौरा असेल.

1950 साली सुरू झालेली परंपरा कायम ठेवत काठमांडूमधील एका कार्यक्रमात नेपाळचे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी (Bidhya Devi Bhandari) या नेपाळी सेनेच्या मानद रँकनं जनरल नरवणे यांना सन्मानित करणार आहेत. भारतही नेपाळच्या सेना प्रमुखांना भारतीय सेनेचे जरनल हा मानद रँक देत आलेला आहे.

समग्र रणनीतीक हितांसंदर्भात नेपाळ भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही देशात जुन्या काळापासून रोटी-बेटी व्यवहारही झाले आहेत.

You might also like