लैंगिक छळप्रकरणी मेजर जनरल निलंबित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्करामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आसाम रायफलच्या एका मेजर जनरलला निलंबित करण्यात आले आहे.  महिलेने आरोप केल्यानंतर त्याच्यावर हि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आता त्याला यापुढे कोणत्याही प्रकारचे निवृत्ती वेतन तसेच लाभ मिळणार नाही. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी ही कारवाई केली. २०१६ मध्ये या मेजर जनरल विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावेळी तो नागालँडमध्ये कार्यरत होता. त्यानंतर त्याला तात्काळ निलंबित करण्यात आले होते. मात्र आता त्याच्यावर कडक कारवाई करत त्याचे निवृत्ती वेतन देखील न देण्याचे आदेश देण्यात आल्याने त्याला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, लष्कराने याची माहिती देताना सांगितले कि, या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like