Army Helicopter Crash | सीडीएस बिपीन रावत यांना घेवुन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश, पत्नी ‘मधुलिका’ यांच्यासह 9 जण करत होते प्रवास; 4 जणांचे मृतदेह आढळले (व्हिडीओ)

तामीळनाडू : वृत्तसंस्था – भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर (Army Helicopter Crash) कोसळले आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) हेलिकॉप्टरमध्ये होते. ज्यावेळी हेलिकॉप्टर कोसळले (Army Helicopter Crash) त्यावेळी बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि 9 लोक प्रवास करत होते. या घटनेत 3 लोक गंभीर जखमी झाले असून 4 जणांचे मृतदेह (Deadbody) आढळून आले आहेत. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती हवाई दलाने दिली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलगिरी पर्वत रागांमध्ये आज दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडली (Army Helicopter Crash) आहे. इतरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहीत माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे (MoS Subhash Bhamre) यांनी दिली आहे. या घटनेत 3 गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

बिपीन रावत हे आपल्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्यासमवेत वेलिंग्टन मध्ये एका कार्यक्रमासाठी जात होते. वेलिंग्टन मध्ये आर्मी सेंटर येथे ही घटना घडली आहे. हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह जवळपास 9 जण होते. हवाई दलाचे Mi-17V5 हेलिकॉप्टर होते.

 

 

Web Title :- Army Helicopter Crash | Four bodies recovered, three injured persons rescued from IAF helicopter crash site in TN CDS Gen Bipin Rawat IAF Mi-17V5 helicopter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Army Helicopter Crash | तमिळनाडूमधील कुन्नूरमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं ! हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत पत्नीसह इतर 9 जण असल्याची माहिती; दोघांचा मृत्यू (व्हिडीओ)

Gopichand Padalkar | भाजप आ. गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले – ‘महाभकास’ आघाडीने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेका घेतलाय’

Dr. Suresh Jadhav | लस निर्मितीमध्ये महत्वाचं योगदान देणारे ‘सिरम’चे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांचे निधन

RBI Alert | तुमच्याकडील 500 रुपयांची हिरव्या पट्टीची ही नोट बनावट आहे का? याबाबत RBI ने दिली महत्वाची माहिती