Army Helicopter Crash | तामिळनाडूमधील हेलिकॉप्टर दुर्घटनेमुळे भारतावर शोककळा ! ‘शौर्य’ चक्राने सन्मानित कॅप्टन वरुण सिंह बचावले, हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाची लढाई

तामिळनाडू : वृत्तसंस्था – Army Helicopter Crash | भारतावर शोककळा पसरणारी मोठी दुर्घटना आज घडली आहे. भारताचे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचं निधन (Died) झालं आहे. तसेच त्यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्यासह विमानात असलेल्या आणखी 11 जणांचं दुर्देवी निधन झालं आहे. हवाई दलाचे हेलिकॉप्टर (Mi17-V5) कोसळल्याने (Army Helicopter Crash) या दुर्घटनेत 13 जणांचं निधन झालं तर भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Captain Varun Singh) एकमेव जिवंत असून त्यांची मृ्त्यूशी झुंज सुरु आहे.

 

या झालेल्या दुर्घटनेत (Army Helicopter Crash) भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Captain Varun Singh) जखमी (Injured) झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वरुण सिंग हे खूप शूर आहेत. त्यांनी 2020 मध्ये मोठ्या संकटातून तेजस लढाऊ विमान वाचविलं होतं. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण प्रवासी करत होते. त्यात बिपीन रावत, तसेच त्यांच्या पत्नी, लष्कराचे काही अधिकारी तसेच इतर सुरक्षारक्षक, कमांडोज उपस्थित होते.

दरम्यान, वरुण सिंह हे मूळचे भोपाळचे आहेत. त्यांनी अदम्य धैर्य दाखवत दहा हजार फूट उंचीवरून विमान सुरक्षितपणे उतरवले.
आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवत लोकवस्तीच्या बाहेर विमान उतरवले होते.
वरुण यांना प्रतिष्ठित शौर्य चक्र पुरस्कार मिळाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला होता.
कुटुंबात उत्सवाचे वातावरण होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब देशभक्त आहे. वडील आणि भाऊ यांनीही लष्करात सेवा बजावली आहे.
वडील कर्नल केपी सिंह यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

 

Web Title :- Army Helicopter Crash | IAF group captain varun singh injured in military chopper crash was awarded shaurya chakra he in in hospital

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! ‘ही’ योजना 2024 पर्यंत सुरू राहणार; जाणून घ्या कोणाला होणार फायदा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 58 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

Bigg Boss 15 | करण कुंद्राला वाटू लागली तेजस्वीला गमवण्याची भिती, म्हणाला – ‘शो’ नंतर…’

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding | तुम्ही सुद्धा पाहू शकता कॅटरीना कैफ आणि विक्की कौशलचा विवाह, परंतु… जाणून घ्या सर्वकाही